चिमुरडी रंगली आंब्याचा आस्वाद घेण्यात

पुणे : धनश्री बचत गटाने आयोजित केलेली लहान मुलांची आंबा खा ही स्पर्धा सोमवारी मोठ्या दिमाखात पार पडली. यंदा आंब्याची आवक कमी असल्याने भाव तेजीत आहे. त्यामुळे चिमुरड्यांना मनसोक्त आंबे खाण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली.

यंदाचे या स्पर्धेचे नववे वर्ष असून बाळ गोपाळ चवीने हापूस आंब्यांवर ताव मारला. यावेळी, मुलांचे चेहरे पिवळे जर्द झाले होते. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदीराच्या प्रांगणात हा कार्यक्रम पार पडला.

पुण्यात महाराष्ट्र माझा आंबा मोहोत्सवाला सुरवात झाली असून धनश्री बचत गटाने हा आगळा वेगळा उपक्रम आयोजित केला आहे.

पहा ही आगळी-वेगळी आंबा खाण्याची स्पर्धा