Kidney Stone: किडनी स्टोन वर घरगुती उपाय

उन्हाळा सुरु होताच अनेक शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागते. सतत तहान लागणे, घाम येणे, उन्हाळ्या लागणे व डीहायड्रेशन सारख्या त्रासाला नेहमीच तोंड द्यावे लागते. तर काही जणांना उन्हाळ्यामध्येच अनेक आजाराला सामोरे जावे लागते. त्यापैकी एक म्हणजे किडनी स्टोन. जर तुम्हाला किडनी स्टोनचा त्रास जाणवत तर काय काळजी घ्यावी त्यासाठी विशेष…
भरपूर पाणी प्या: पाण्याद्वारे तुमच्या शरीरातील टॉक्सिन्स व किडनी स्टोनसाठी कारणीभूत असणारे टाकाऊ मीठ बाहेर टाकले  जाते. यामुळे दिवसभरात 8 ते 10 ग्लास पाणी प्यायल्याने किडनी स्टोन व इतर आरोग्य समस्या उद्भवत नाहीत. ताज्या फळांचा रस, ताक, लिंबू पाणी ही पेय देखील पिल्यास शरीरातील पाण्याची पातळी संतुलित होते.

 

खाण्यावर नियंत्रण: अति मीठामुळे तुमच्या हाडांमधील कॅल्शियम बाहेर टाकले जाते तर अति साखरेच्या पदार्थामुळे देखील शरीरात ग्लूकोजचे प्रमाण वाढते या दोहोंचा थेट परिणाम किडनीवर होतो. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये आहारात साखर व मीठ कमी प्रमाणात घ्या. तसेच स्टोनची समस्या टाळण्यासाठी कॅल्शियम व ऑक्सिलेटयुक्त पदार्थांचे प्रमाण आहारात कमी ठेवा.
डॉक्टरांचा सल्ला घ्या: अति प्रमाणात घेतलेले अॅन्टासिड व कॅल्शियमच्या गोळ्या देखील हानिकारक ठरु शकतात. या औषधांमुळे देखील किडनी स्टोन होऊ शकतो. जर तुम्ही अशी औषधे घेत असाल तर याबाबत तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा अगोदर सल्ला घ्या. कारण कदाचित या औषधांचे सेवन कमी करुन तुम्हाला तुमच्या शरीरात किडनी स्टोन विकसित होणे टाळता येऊ शकते.
लघवी थांबवू नका: बराच काळ लघवी थांबवून धरणे तुमच्या किडनीसाठी चांगले नाही. त्यामुळे तुम्हाला किडनी स्टोनचा धोका निर्माण होऊ शकतो. कारण लघवी तुमच्या मूत्राशयामध्ये जेवढा वेळ जमा होईल तेवढा वेळात मूत्राशयातील टाकाऊ मिनरल्स आणि मीठाचे किडनीस्टोनमध्ये रुपांतर होण्यास मदत होईल.