हिंगोली जिल्ह्यामध्ये अल्पवयीन मुलीचे अपहरण

हिंगोली : मुळ राजस्थान मधील जडीबुटी विकणे तसेच मनोरंजनाचे खेळ करणाऱ्या कुटूंबासोबत राहत असलेल्या ९ वर्षीय मुलीचे कामठा फाटा परिसरातून अपहरण झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी घडली आहे. या प्रकरणी बाळापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजस्थानातील टोक जिल्ह्यातील बहिर मुहसल्लातील रहिवासी महिला भिक्षा मागणे, मनोरंजनाचे खेळ, जडीबुटी विकण्याचे काम करतात. ते काही दिवसांपुर्वी आखाडा बाळापूर परिसरात पाल टाकुन राहत होते. २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ते  २ वाजेदरम्यान कामठा फाटा येथील पाण्याच्या टाकीजवळून कोणी तरी अज्ञात व्यक्तीने तिच्या मुलीचे अपहरण केल्याचे समजताच तिने पोलीस ठाणे गाठले.

दरम्यान, तीच्याशी कोणताही संपर्क न झाल्याने त्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पो.नि. रवी हुंडेकर यांच्या मार्गदर्शनासाठी पोलिस उपनिरिक्षक अच्युत मुडपे करत आहेत.

महत्वाच्या बातम्या :