बालकाचे अपहरण करुन मोबाइल हिसकावला

औरंगाबाद : तुझ्या मित्राने माझ्या भावाला मारहाण केली. तेव्हा त्याचा पत्ता सांग म्हणत अपहरण केलेल्या बालकाला चौघांनी मारहाण करुन मोबाइल हिसकावला. ही घटना २९ जुलै रोजी दुपारी चारच्या सुमारास विश्रांतीनगरात घडली.

सिडको बसस्थानकाजवळ सोडतो असे म्हणत अजय कागडा याने बळजबरी बालकाला गांधीनगर भागातील मोकळ्या मैदानात नेले. तेथे दोन नातेवाईक आणि मित्रांच्या मदतीने त्याला तुझा मित्र अक्षय गरड कोठे आहे. त्याने माझ्या भावाला मारहाण केली आहे. असा जाब विचारत धमकावण्यास सुरूवात केली.

तेव्हा बालकाने अक्षयबाबत कोणतीही माहिती नसल्याचे सांगूनही कागडा व त्याच्या साथीदारांनी बेल्टने बालकाला मारहाण केली. तसेच त्याच्या खिशातील पाच हजारांचा मोबाइल हिसकावून घेतला. या प्रकारानंतर घाबरलेल्या बालकाने पुंडलिकनगर पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली. याप्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक आढाव करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या