खुशबू तावडेने शेअर केले डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाचे सुंदर फोटो

khushboo tawade

मुंबई: स्टार प्रवाह वरील सुप्रसिद्ध ठरलेली मालिका म्हणजे ‘देवयानी’. या मालिकेतील अभिनेता संग्राम साळवी याचे पात्र प्रचंड लोकप्रिय झाले होते. या मालिकेने प्रेक्षकाचा निरोप घेतला असला तरी कलाकारावरील चाहत्यांचे प्रेम कमी झाले नाही. काही दिवसापूर्वीच अभिनेता संग्राम साळवी आणि त्याची पत्नी खुशबू तावडे यांनी चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. त्यानंतर नुकतेच तिने तिच्या डोहळे जेवण्याच्या कार्यक्र्माच फोटो शेअर केले आहे.

सोशल मिडियावर खुशबने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती खूप सुंदर दिसत असून तिने हिरव्या रंगाची साडी परिधान केली आहे. यावेळी तिचे कुटुंब देखील तिथे उपस्थितीत असल्याचे दिसत आहे. यात खुशबची बहीण अभिनेत्री तीतिक्षा तावडे सोबत असून, मावशी होणार असल्याने ती देखील आनंदी असल्याचे दिसत आहे.

संग्राम आणि खुशबू दोघांनी देखील त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर करत आई-बाबा होणार असल्याची बातमी दिली आहे. ५ सप्टेंबरला खुशबूच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संग्रामने दोघांचा एक खास फोटो शेअर केला होता.

‘सांजबहर’ या शॉर्ट फिल्ममध्ये संग्राम आणि खशबू एकत्र कामा केले होते. यावेळीच दोघांचे प्रेम झाले आणि त्यानंतर मार्च २०१८ सालामध्ये दोघांनी लग्नगाठ बांधली आणि आता लवकरच ते दोघे आई- बाबा होणार आहेत.

महत्वाच्या बातम्या :