भिडे गुरुजींच्या आंब्यानंतर आता मौलवीचे फळ ; वाचा काय केलाय अजब दावा

टीम महाराष्ट्र देशा : आंबा खाल्ला की मुलं होतात, या भिडे गुरुजींच्या वक्तव्यानंतर आता औरंगाबादमधील एका मौलवीनं अजब दावा केला आहे. खुल्ताबादमधील दर्ग्यात दोन झाडं आहेत. त्यातील एका झाडाचं फळ खाल्लं की मुलगा होतो आणि दुसऱ्या झाडाचं फळ खाल्लं की मुलगी होते, असा दावा या मौलवींनी केला आहे.

खुलताबाद येथे हजरत शेख शा जलालउद्दीन गंजे रवा सफरवर्दी यांचा दर्गा आहे. या दर्गा परिसरात आसेचे झाड आहे. तसेच ‘परीयो का तालाब’ देखील आहे. दर्गा परिसरातील आसेच्या झाडाबाबतच्या चमात्कारांचा दावा मोहम्मद समीर मुजावर या मौलानांनी केला आहे. एवढ्यावरच हे मौलवी थांबले नाहीत, या झाडांची फळं खाल्ल्यानंतर तृतीयपंथीयांनादेखील मुलं झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे. मुलं झालेल्या तृतीयपंथीयांची समाधीदेखील याठिकाणी असल्याचं मौलवींनी सांगितलं.

याशिवाय दर्ग्याजवळ असलेल्या तलावात रात्री नग्न आंघोळ केल्यास कर्करोग आणि एड्ससारख्या गंभीर रोगांवरही निदान होतं, असाही दावा या मौलवींनी केला आहे.