fbpx

सोलापूर लोकसभा : ढोबळेंच्या भाजप प्रवेशाने खा.बनसोडे यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह !

टीम महाराष्ट्र देशा(प्रवीण डोके) – राष्ट्रवादीचे माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी जालना येथे सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. सोलापूर लोकसभेसाठी ढोबळे यांनी वरिष्ठ स्तरावरून फिल्डिंग लावली असल्याचे समजते आहे. त्यामुळे विद्यमान खासदार शरद बनसोडे यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून ढोबळे हे भाजपत प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. काही दिवसांपूर्वी ढोबळे यांनी नितीन गडकरी यांची भेट घेतली होती. ढोबळे यांनी फिल्डिंग लावून सोलापूर लोकसभेचे तिकीट एका बड्या नेत्याकडून फिक्स केले असल्याची माहित विश्वसनीय सूत्राकडून मिळाली आहे.

दुसरीकडे ढोबळे यांच्या भाजप प्रवेशाने बनसोडे यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. बनसोडे हे गेल्या अनेक दिवसांपासून सोलापूर लोकसभा मतदार संघ पिंजून काढत आहेत. मतदारांच्या गाठी-भेटी, विकासकामांची उद्घाटने यासह दुष्काळी भागाचे दौरे यावर बनसोडे यांचा भर आहे. परंतु ढोबळे यांच्या भाजप प्रवेशाने त्यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याची चर्चा सध्या जोरात आहे.

मीच पुन्हा खासदार होणार अशी घोषणाच बनसोडे यांनी काही दिवसांपूर्वी केली आहे आणि त्या दृष्टीने तयारी देखील लागले आहेत. गेल्यावेळी पेक्षा दुप्पट मताने यावेळी मी निवडून येणार असल्याचे बनसोडे यांनी म्हटले होते.

त्यांच्याच पक्षातील राज्यसभा खासदार अमर साबळे यांचेही नाव पुढे आहे. तर आता ढोबळे यांची उमेदवारी फायनल असल्याचे बोले जात आहे. त्यामुळे बनसोडे मात्र कमालीचे चिंतेत दिसत आहेत.

सोलापूर लोकसभा मतदार संघ हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. 1951 ते 2014 या कालावधीत एका पोटनिवडणुकीसह झालेल्या 17 निवडणुकांत तब्बल 12 वेळा या मतदार संघातून कॉंग्रेसचे खासदार झाले आहेत. २०१४च्या लोकसभा निवडणुकीमध्ये तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा धक्कादायक पराभव झाला होता. मोदी लाटेत भाजपचे ऍड. शरद बनसोडे यांचा अनपेक्षित विजय झाला होता.

 

2 Comments

Click here to post a comment