हे आहेत भारतातील १४ ठर्की बाबा ; कोण चालवायच सेक्स रॅकेट तर कोणावर हत्येचा आरोप

अलाहाबाद : गेल्या काही दिवसांपासून धर्माच्या नावाखाली लोकांच्या भावनांशी खेळण्याचा धंदा काही बाबा लोकांनी सुरु केला आहे. यामुळे आता अखिल भारतीय आखाडा परिषदेने देशभरातील १४ भोंदू बाबांची यादी जाहीर केली आहे.

पाहूयात भोंदू बाबा आणि त्यांची कारकीर्द

१ आसाराम बापू उर्फ आशुमल शिरमलानी

asaram bapu tharki baba
आसाराम बापू

आसाराम बापूचे खरे नाव आशुमल शिरमल असून त्याचे अनुयायी त्यांना बापूजी या नावाने उल्लेखतात. अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली सप्टेंबर २०१३ मध्ये आसाराम बापूला इंदूर येथील आश्रमातून अटक झाली होती. आसाराम बापू सोबतच त्याचा मुलगा नारायण साई याच्यावरही गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. देशभरात दुष्काळी परिस्थिती असताना बापू मात्र आपल्या आश्रमात गोकुळ अष्टमीला लाखो लिटर पाण्याने होळी खेळल्याने जास्त चर्चेत आले होते. बाबा गिरी सुरु करण्याच्या आधी आसाराम बापू चहा विकण्याचा व्यवसाय करत होते.

२. सुखविंदर कौर उर्फ राधे मांradhe-maa-सुखविंदर कौर उर्फ राधे मां हि एक स्वयंम घोषित साध्वी आहे. राधे मां कायम नववधू प्रमाणे करत असलेल्या पेहरावामुळे प्रसिद्ध आहे. एका कुटुंबाला त्यांच्या सुनेकडून हुंडा मागायला लावल्या प्रकरणी राधे मांवर गुन्हा नोंदवण्यात आलेला. तसेच  हायप्रोफाईल सेक्स रैकेट चालवत असल्याचा आरोप बॉलीवूडमधील मॉडेल डॉली बिंद्रा हिने राधे मांवर लावला आहे. त्याचप्रमाणे राधे मां अनेक गैर कृत्य करत असल्याचा आरोपही लावण्यात आला आहे.

३. नारायण साई      नारायण साई हा आसाराम बापूचा मुलगा आहे. नारायण साई याने अनैसर्गिक सेक्स तसेच बलात्कार केल्याचा आरोप सुरतमधील एका मुलीने केला आहे. नारायण साई हा कायम मुलींकडून स्वत;ला ‘स्वीट हार्ट’ म्हणवून घेयचा. नारायण साईने अनेक महिलांवर अत्याचार केल्याचा आरोप खुद्द त्याच्या पत्नीनेच केला. आपल्या विरोधात पोलिसांत जबाब देणाऱ्या साक्षीदाराची हत्या करण्याचा कट रचल्याचा आरोपही नारायण साईवर आहे.

४. गुरमीत राम रहीम सिंहbaba ram rahimआपल्या आश्रमातील दोन साध्वींच्या बलात्कार प्रकरणी बाबा राम रहीमला २० वर्ष्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. बाबाच्या अटकेनंतर उसळलेल्या हिंसाचारात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. सध्या बाबाच्या डेऱ्याची म्हणजेच आश्रमाची झाडाझडती सुरु असून त्यात अनेक अलिशान गाड्या, बाबाच स्वत;च चलन. ३ हजाराच्यावर बूट. महागडे कपडे, शस्त्रसाठा आणि अनेक धक्कादायक गोष्टी आढळून आल्या आहेत. तसेच बाबाची पोलखोल करणाऱ्या अनेकांच्या हत्या केल्याचा आरोप बाबा राम राहिमवर लावण्यात आला आहे.

5. स्वामी असिमानंद स्वामी असिमानंद हे पूर्वाश्रमीचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सेवक आहेत. 2007 साली अजमेर शरीफ दर्गा, मक्का मस्जिद तसेच मालेगाव बॉम्ब स्फोट प्रकरणात अटक करण्यात आली होती. समझोता एक्सप्रेस बॉम्ब स्फोट प्रकरणात ही असिमानंद हे आरोपी आहे.

6. सच्चिदानंद गिरी उर्फ सचिन दत्तसच्चिदानंद गिरी उर्फ सचिन दत्ता याला निरंजनी आखाड्याचे महामंडलेश्वर म्हणून नियुक्त करण्यात आले होते. मात्र सच्चिदानंद गिरी हा बियर बार आणि डिस्कोथिक चालवत असल्याचे उघड झाल्यावर मोठे वादंग झाले होते.

7. ओमबाबा उर्फ विवेकानंद झाswami om tharki babaविवेकानंद झा उर्फ ओम बाबा हा स्वयंम धर्मगुरू आहे. सलमान खानच्या बिगबॉस या कार्यक्रमातुन बाबा प्रकाश झोतात आला. ओम बाबावर मध्यंतरी सायकल चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. वादग्रस्त वक्तव्य करण्यासाठी ओंमबाबाला ओळखलं जातं. चोरी, आर्म्स एक्ट, पोटा, खोट्या केसेस,मसाज पार्लरच्या नावावर ब्लैकमेलिंग आणि जमीन हडपण्याचे बाबावर आरोप आहे.

8. निर्मल बाबा उर्फ निर्मलजीत सिंहnirmalbabaकापड्यापासून ते वीटभट्टीचा व्यवसाय करून थकल्यांनातर निर्मलजीत सिंह हा निर्मल बाबा बनला. बाबाने कृपा करणारा बाबा म्हणून मोठं नाव कमावलं आहे. श्रद्धेच्या नावावर अनेकांची कोट्यावधीची फसवूनक केल्याचा आरोप निर्मल बाबावर आहे. हा बाबा आपल्या भक्तांना समोसा ते पिझ्झा खाण्याचे सल्ले देत असल्याने चर्चेत आहे. बाबाच्या प्रवचन कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी भक्तांना 3870 ते 6450 मोजावे लागायचे.

9. इच्छाधारी भीमानंद उर्फ शिवमूर्ती  द्विवेदीichadari bhimananad tharki baba

इच्छाधारी संत. भीमानंद, शिवमूर्ती द्विवेदी अशी अनेक नावे या बाबाची आहेत. इच्छाधारी भीमानंद हा कायम सापा बरोबर फिरने आणि नागीण डान्स करण्यासाठी प्रसिद्ध आहे. इच्छाधारी भीमानंद हा हायप्रोफाईल सेक्स रॅकेट चालवायचा त्याने तब्बल 600 च्या वर मुलींना आपल्या अवैद्य धंद्यात आणलं होतं. याची संपत्ती 2500 कोटींच्या वर असल्याचं बोललं जातं. दिवसभर राम नाम आणि रात्री जीन्स टीशर्ट घालून शिवमूर्ती द्विवेदी आलिशान गाड्यांमध्ये फिरत सेक्स रॅकेट चालवत होता.

10. रामपाल २००६ मध्ये सतलोक आश्रम मधील जमीन वादावरून एका व्यक्तीची हत्त्या करण्यात आली होती. त्यामध्ये रामपाल विरुद्ध केस सुरु आहे. रामपालवर देश द्रोहाचा गुन्हा दाखल असून तो गेल्या तीन वर्षापासून जेलमध्ये आहे. रामपालला अटक करण्यास पोलीस गेले तेव्हा मोठ्या प्रमाणात आश्रमातून शस्त्रसाठा मिळाला होता. दरम्यान ज्युनियर इंजिनियरची नौकरी सोडून रामपाल स्वयंम घोषित गुरु बनला होता,

११. आचार्य कुशीमन
विहिंपचे प्रांत समन्वयक . २०१३ मध्ये अयोध्येतील यात्रेत अटक, लोकांच्या भावना भडकावल्याचा आरोप.

१२. ओम नमः शिवाय बाबा
१३. मलखान सिंह
१४. बृहस्पती गिरी