खेलो इंडिया स्कूल गेम्सचे प्रसारण हक्क स्टार स्पोर्ट्सकडे

khelo-india

टीम महाराष्ट्र देशा: क्रिडा व युवक कल्याण मंत्रालयाने स्टार स्पोर्ट्स वाहिनीची पाच वर्षाच्या कालावधीसाठी खेलो इंडिया स्कूल गेम्सचे अधिकृत प्रसारण व निर्मीती भागीदार म्हणून निवड केली आहे. याबरोबर स्टार स्पोर्ट्सकडे खेलो इंडिया स्कूल गेम्सचे प्रसारण हक्क २०२२ पर्यंत राहतील.

Loading...

एका अधिकृत निवेदनात क्रिडा व युवक कल्याण राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड म्हणाले की, पारदर्शक निविदा प्रक्रियेतून स्टार स्पोर्ट्सची खेलो इंडिया स्कूल गेम्सच्या प्रसारणासाठी निवड केली आहे.या स्पर्धेचे प्रसारण दूरचित्रवाणी व डिजिटल प्लेटफार्मच्या माध्यमातून एकाचवेळी होणार आहे. ते पुढे म्हणाले की, खेलो इंडियाच्या माध्यमातून आपल्या मुलांच्या आयुष्यात खेळांविषयी आवड व ओढ निर्माण होईल. त्याचबरोबर पालकांनी व शिक्षकांनी मुलांना खेळांचे महत्व पटवून देऊन विविध खेळ खेळन्यास त्यांना प्रेरित करण्याची गरज आहे.

खेलो इंडिया स्कूल गेम्स हा भारत सरकारचा महत्वपूर्ण ऊपक्रम आहे. या स्पर्धेचे पहिले सत्र ३१ जावेवारी २०१८ पासून सूरु होणार आहे. ज्यामध्ये १७ वर्ष वयोगटाखालील ६००० मुले व मुली १६ विविध क्रिडा प्रकारात सहभागी होतील. यावेळी क्रिडा मंत्रालयाने सांगितले की, या स्पर्धेतून १००० सर्वोत्कृष्ठ खेळाडूंची क्रिडा शिष्यवृत्तीसाठी निवड होईल. यामधे आठ वर्षांसाठी प्रती वर्षी पाच लाख रूपये शिष्यवृत्ती दिली जाईल. या माध्यमातून देशाची जागतिक क्रिडा स्पर्धांमधे कामगिरी सुधारण्यास मदत होईल. स्टार स्पोर्ट्सच्या खेळांविषयीच्या सर्वसमावेशक व प्रेरणादायी धोरणांमुळे स्टार स्पोर्ट्सची खेलो इंडिया स्कूल गेम्सचा प्रसारण व निर्मीती भागीदार म्हणून निवड करण्यात आली आहे.

2 Comments

Click here to post a commentLoading…


Loading…

Loading...