कोजागिरी स्पेशल- मसाला  दूध कसे बनवाल ?

masala milk recipes to try this Kojagiri Purnima

कोजागिरीचे मसाला  दूध कसे बनवाल ?

साहीत्य:
* दूध एक लिटर (फुल क्रिमचे म्हशीचे घ्यावे)
* साखर अर्धी वाटी(आवडीनुसार कमी-जास्त करावी)
* वेलचीपूड १ टीस्पून
* जायफळ १/२ टीस्पून
* बदाम,काजू,पिस्ता ची भरड पावडर दोन टेस्पून (सजावटीसाठी थोडे पातळ काप ठेवावेत)
* चारोळी १ टीस्पून
* केशर चिमुटभर
कृती:
प्रथम एका जाड बुडाच्या पातेल्यामधे दुध तापण्यासाठी गॅसवर ठेवावे. तापून फुगा आला की,गॅस बारीक करावा व त्याच्यामधे डाव टाकावा अथवा एक काचेची चहाची बशी पालथी टाकावी म्हणजे दुध तळाला लागत नाही.आणि पाच मिनीटे उकळू द्यावे.
उकळून थोडे आटले की त्यामधे वेलची,,सुक्या मेव्याचे कुट व साखर आणि केशर घालावे.एक उकळी आणावी व गॅस बंद करावा.
सजावटीसाठी शिल्लक ठेवलेले सुकामेव्याचे काप व चारोळ्या वरून घालावेत व आवडीप्रमाणे ,फ्रिजमधे थंड करून किंवा गरम पिण्यास द्यावे.शक्यतो कोमटसर दुधच प्यावे.चविला छान पण लागते व थंड दुधाने पोटात गॅस होतात,ते होण्याची भिती पण रहात नाही.
टीप :
* सुक्यामेव्याची बारीक पावडर न करता थोडे भरड कूटच ठेवावे दुध पिताना मधे-मधे दाताखाली आलेले छान लागतात.
* जायफळ पूड अगदी ऐनवेळी दूध देताना घालावी. उकळताना घातल्यास दूध फाटण्याची शक्यता असते.
* दिलेल्यापैकी फक्त कोरडे साहित्य पावडर करून बाटलीत भरून ठेवले तर एरव्ही पण हा दूध मसाला गरम दूधामधे घालून पिता येतो.