अखेर ‘या’ मार्गाने धावली लालपरी

अखेर ‘या’ मार्गाने धावली लालपरी

ST Bus

मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. त्याच सोबत मुंबई येथील आझाद मैदानावर देखील ठिय्या आंदोलन करण्यात आले. गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. यात एसटी कर्मचाऱ्यांची पगारवाढ सरकारने केली आहे, मात्र तरी देखील काही संघटना विलीनीकरण करण्याच्या मुद्द्यावर ठाम असल्याने हे आंदोलन अद्यापही सुरूच आहे.

एसटी बस बंद असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांचे खूप हाल होत आहेत. ग्रामीण भागाला शहराशी जोडण्याचं काम हे केवळ लाल परीच करते, मात्र तीच आज बंद आहे. ग्रामीण भागातील नागरिक त्याच सोबत विद्यार्थ्यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. एसटी कामगारांच्या संपाचा खासगी बस सेवा देणाऱ्या कंपन्या अव्वाच्या सव्वा तिकीटाच्या किंमती करून बसले आहेत. सर्वसामान्य माणसाच्या खिशाला यामुळे चांगलेच छिद्र पडले आहे.

एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपानंतर खेड आगारातील काही कर्मचारी कामावर रुजू झाल्याने खेड स्थानकातून पहिली एसटी चिपळूणकडे रवाना झाली आहे. तब्बल १९ दिवसांनंतर खेड स्थानाकाच्या फलाटावर एसटी आल्याने स्थानकावर एसटीची वाट पाहणाऱ्या लोकांमध्ये आनंद बघायला मिळाला. आता पुन्हा एकदा एसटी बस सुरू झाल्या तर सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

महत्वाच्या बातम्या: