दिल्लीत तिन्ही ताई संसदेच्या आवारात एकत्र

दिल्ली : शरद पवार यांच्या कन्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या भाजपच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे आणि एकनाथ खडसे यांच्या सून व खासदार रक्षा खडसे यांनी दिल्ली येथी संसदेच्या आवारात एकत्र दिसून आल्या आहेत. त्यांनी सोबत एक फोटो सुद्धा काढला आहे. तो फोटो सध्या सोशल मिडियात खूप मोठ्या प्रमाणत व्हायरल झाला आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे राजकीय हाडवैर सर्वश्रुत होते. सत्ताधारी शरद पवारांवरती टीका असोकी त्यांना धोबीपछाड देण्याची एकही संधी विरोधी पक्षाचे नेते म्हणून गोपीनाथ मुंडे नव्हते.

राजकारणापलीकडची मैत्री काय असते हे या तिघींच्या फोटोवरून लक्षत येते. तस पाहता या तिन्ही खासदारांना आपापले कार्यकर्ते ताई असेच म्हणतात. या तिन्ही ताईंचा फोटो सध्या चर्चेचा विषय आहे. या ताईंची पक्षापलीकडे जाऊन मैत्री असल्याचे या छायाचित्रावरून दिसते आहे. राजकारण राजकारणाच्या जागी आणि वैयक्तिक, मैत्री संबंध वेगळ्या जागेवर ठेवत या दोन बड्या नेत्यांच्या कन्या आणि सोबतीला एकनाथ खडसे यांच्यासुना या तिघी एकत्र आलेल्या दिसल्या.

You might also like
Comments
Loading...