खर्गे हे नास्तिक आहेत – संजय निरुपम

Sanjay Nirupam

टीम महाराष्ट्र देशा : फ्रान्सकडून भारताला मिळालेल्या पहिल्या राफेल लढाऊ विमान काल भारतीय वायू सेनेच्या ताफ्यात दाखल करण्यात आले. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पारंपारिक पद्धतीने विमानाची पूजा केली. यावर काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी ही पूजा तमाशा असल्याची टीका केली. मात्र काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी खर्गे हे नास्तिक आहेत, पण काँग्रेसमधील प्रत्येक जणच नास्तिक नाही. असे म्हणत खर्गेंवर निशाणा साधला आहे.

भारताने फ्रान्ससोबत ३६ राफेल विमानांचा करार केला आहे. ज्यापैकी पहिलं विमान भारताला दसऱ्याच्या मुहूर्तावर मिळालं. फ्रान्समध्येच या विमानाची पूजा करताना सिंह यांनी विमानावर ओम काढला, हार घातला आणि चाकाखाली लिंबू ठेवलं. हा सर्व प्रकार तमाशा होता, असं म्हणत खर्गेंनी टीका केली. ते म्हणाले, ‘आम्ही बोफोर्ससारखी शस्त्र आणली तेव्हाही त्याची पूजा केली नव्हती, असेही ते यावेळी म्हणाले.

दरम्यान, निरुपम यांनी दोन दिवसांपूर्वीच खर्गे यांच्यावर निशाणा साधला होता. निवडणुकीच्या तयारीसाठी खर्गेंनी जी बैठक बोलावली होती, ती १५ मिनिटात बैठक संपवली आणि कुणाला काहीही बोलू दिलं नाही. असे नेते काँग्रेसला वाचवतील की बंदोबस्त करतील? असा प्रश्न त्यांनी विचारला होता. लोकसभा निवडणुकीच्या काळात मुंबई कॉंग्रेस च्या अध्यक्ष पदावरून दूर व्हाव लागल आणि नंतर विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी शिफारस केलेल्या एका उमेदवारालाही संधी देण्यात आली नाही. त्यामुळे प्रचारातही सहभागी होणार नसल्याची भूमिका संजय निरुपम यांनी घेतली.

महत्त्वाच्या बातम्या :