श्रेयस अय्यरला बाद केल्यानंतर खलीलने मैदानातून कुणाला कॉल केला ?

टीम महाराष्ट्र देशा- आयपीएलच्या १२  हंगामात दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यातील एलिमिनेटर लढतीत दिल्लीने विजय मिळविला. या सामन्यात हैदराबादचा गोलंदाज खलील अहमदचा अनोख्या अंदाजातील सेलिब्रेशन चर्चेचा विषय बनला आहे.

दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार श्रेयस अय्यरला बाद केल्यानंतर खलीलने हटके अंदाजात आनंद व्यक्त केला. मैदानात त्याने केलेल्या हावभावाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. खलीलने नेमका कुणाला कॉल लावला असा सवाल आता नेटकरी विचारू लागले आहेत.

खलील अहमदने श्रेयस अय्यरला बाद केल्यानंतर त्याने नंबर डायल करुन कोणाला तरी कॉल करत असल्याची कृती करत विकेट घेतल्याचं कोणाला तरी सांगत असल्याची हावभाव करुन दाखवली होती. त्याच्या या हॅलोवाल्या अंदाजाचा व्हिडिओ आयपीएलच्या अधिकृत पेजवरुन शेअर करण्यात आला आहे.

पाहूया क्रिकेटप्रेमींचे काही हटके ट्वीटस