महापौर, उपसचिव, उपजिल्हाप्रमुख, तालुका प्रमुखांसोबत खैरेंचे विठ्ठल दर्शन, अन वारकऱ्यांसाठी ‘देऊळ बंद’

Chandrakant Khaire MP

औरंगाबाद : पांडुरंग भक्त आषाढी एकादशीची वर्षभर वाट पाहत असतो. विठ्ठलाच्या सावळ्या रुपाचे दर्शन हेच त्याचे उद्दिष्ठ असते. त्यासाठी लाखो वारकरी पायी दिंडी काढतात. औरंगाबादच्या प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या वाळूजच्या विठ्ठल मंदिरातही औरंगाबादसह परिसरातून हजारो भाविक पायी दर्शनासाठी जातात. मात्र, यंदा राज्य सरकारच्या ‘देऊळ बंद’च्या आदेशामुळे अनेक भाविकांना विठ्ठलाचे दर्शन घेता आले नाही. असे असताना शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी मात्र, लवाजम्यासह विठ्ठलाचे दर्शन घेतले. खरा वारकरी मंदिराबाहेर असताना खैरेंनी केलेली ही पूजा विठ्ठलाच्या चरणी कितपत पोहोचली असेल?

माजी खासदार चंद्रकांत खैरे हे धार्मिक व्यक्ती आहेत. जिल्ह्यातील सर्वच मंदिराच्या व्यवस्थापनावर त्यांचा वचक आहे. मात्र, कोरोना सारख्या महामारीच्या काळात राज्यातील सर्वच मंदिरे बंद आहेत. त्यामुळे सलग दुसऱ्या वर्षी पंढरपूरची वारी रद्द करण्यात आली आहे. त्यात वाळूजच्या विठ्ठल मंदिरातही भाविकांना प्रवेश बंद करण्यात आला होता. तरी देखील अनेक भाविकांनी कळस दर्शन घेत आपल्या भक्तीची तहाण भागवली.

एकिकडे वारकरी भक्त आपल्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी तहाणलेले असताना दुसरीकडे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्यासोबतच माजी महापौर नंदकुमार घोडेले, युवासेना उपसचिव ऋषिकेश खैरे, उपजिल्हाप्रमुख बाप्पा दळवी, तालुकाप्रमुख हनुमान भोंडवे, गणेश नवले, झळके, युवासेनेचे निखिल कोळेकर, माजी उपसरपंच विष्णू जाधव अशा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र विठ्ठल दर्शन घेतले. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी मंदिर व्यवस्थापन समितीला कठोर निर्बंध लावण्याचे निर्देश दिलेले असताना शिवसैनिकांसाठी हे नियम लागू होत नाहीत का? असा प्रश्न पडतो. वारकरी भक्त विठ्ठलापासून दूर असताना खैरेंनी पदाधिकाऱ्यांसह घेतलेले हे दर्शन अनेकांना पचणी पडलेले नाही.

महत्त्वाच्या बातम्या

IMP