fbpx

खैरे तुम्ही जिगरबाजपणे लढलात : उद्धव ठाकरे

टीम महाराष्ट्र देशा :२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि मित्रपक्षांनी दणदणीत विजय मिळवला आहे. तसेच राज्यासह देशातही कॉंग्रेसचा दारूण पराभव झाला आहे. औरंगाबादमधून मात्र शिवसेनेच्या चंद्रकांत खैरेंना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

याविषयी बोलताना खैरे यांनी ‘माझ्या पराभवाची माहिती आणि कारणमीमांसा करण्यासाठी मी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन केला होता. तेव्हा त्यांनी ‘खैरे काळजी करू नका. तुम्ही जिगरबाजपणे लढलात’ अशा शब्दात मला धीर दिल्याचे सांगितले. चंद्रकांत खैरे अवघ्या साडेचार हजार मतांनी इम्तियाज जलील यांच्याकडून पराभूत झाले. या पराभवामुळे खैरे यांची सलग पाचव्यांदा विजयी होऊन औरंगाबादच्या राजकारणात इतिहास घडविण्याची संधी थोडक्यात हुकली आहे.

दरम्यान, निकालापूर्वीच खैरे यांनी रावसाहेब दानवे यांनी युतीधर्म न पाळत आपल्याला मदत केली नाही अशा शब्दात पराभवाला रावसाहेब दानवे यांना जबाबदार धरले होते.