युवा सेनेच्या नियुक्त्यांमध्ये खैरे-जंजाळांचे वर्चस्व कायम, जैस्वाल समर्थकांना पुन्हा डावलले?

rushikesh jaiswal

औरंगाबाद : युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करताना चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. मात्र, यामध्ये आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या समर्थकांना पुन्हा एकदा डावलण्यात आले आहे. युवासेना उपसचिव राजेंद्र जंजाळ आणि दुसरे उपसचिव ऋषिकेश खैरे यांच्या कार्यकर्त्यांना मात्र, नवीन कार्यकारणीमध्ये स्थान मिळाले आहे. तर ऋषिकेश जैस्वाल यांच्या समर्थकांना पुन्हा एकदा डावलण्यात आले आहे.

युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार वरुण सरदेसाई यांनी औरंगाबादमध्ये घेतलेल्या विशेष बैठकीमध्येच युवासेनेच्या नियुक्त्यांमध्ये पडलेली दुफळी स्पष्ट दिसली होती. मात्र, भविष्यात होणाऱ्या ग्रामीणच्या नियुक्त्यांमध्ये तरी सर्वसमावेशक नियुक्ती करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, या नियुक्त्यांमध्ये देखील राजेंद्र जंजाळ आणि ऋषिकेश खैरे यांच्या समर्थकांना झुकते माप मिळाल्याचे दिसून आले आहे.

शिवसेने जिल्हायुवाधिकारी म्हणून किशोर चौधरी, मच्छिंद्र देवकर पाटील, कैलास जाधव यांच्यावर जबाबदारी सोपावण्यात आली आहे. युवासेनेच्या नियुक्त्या करताना मिरीटच्या आधारावर नियुक्त्या केल्या जातील असे आधीच स्पष्ट करण्यात आले होते. त्या नुसारच या नियुक्त्या झाल्या असल्याचा दावा करण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP