खडसेंचा राजीनामा माझ्यासाठी धक्काच ! पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया

जालना: मी आज दिवसभर प्रवासात असल्याने याची बातमी मी काही पाहिलेली नाही.पण तरीही ही बातमी ऐकून मलाही धक्का बसला आहे.काल रात्री मी एकनाथ खडसे साहेबांनी पक्षात राहावं आणि ते राहतील असं स्टेटमेंट दिलं होतं. आज त्यांच्या राजीनाम्याची बातमी मी माध्यमांमधूनच ऐकली आहे. त्यामुळे याविषयी खोलवर माहिती नाही पण ही बातमी माझ्यासाठी धक्का असल्याचे पंकजा मुंडेंनी म्हटलं आहे.

तर गिरीश महाजन यांनी म्हटले आहे की पक्षांतरासारख्या घटना राजकारणात होत असतात.फडणवीस आणि इतर कुणीही कुठल्या प्रकारचा त्यांच्यावर अन्याय केला नाही, तसेच एकनाथ खडसेंच्या पक्षांतरावर भाजप नक्कीच आत्मचिंतन करेल.त्याचबरोबर शुक्रवारी त्यांच्यासोबत कोण कोण जाणार आहे ते कळेलच.असेही त्यांनी म्हटले आहे.

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी यावर असे म्हटले आहे की ‘राष्ट्रवादीत प्रवेशाचा एकनाथ खडसेंचा निर्णय त्यांच्यासाठी अत्यंत दुर्दैवी आहे, ज्या पक्षात त्यांचं राजकीय करिअर घडलं. बाजार समितीपासून ते महसूल मंत्र्यांपर्यंत त्यांनी मजल मारली होती. तो पक्ष खडसेंनी सोडून जायला नव्हते पाहिजे.

नाथाभाऊंबद्दल पक्षातील कुणाच्याही मनात दुमत नाही. नाथाभाऊंना पक्षाकडून नक्कीच उभारणी मिळाली असती, पण त्यासाठी काही काळ जाणं महत्त्वाचं असंत. काही न्यायालयीन बाबींची पूर्तता होणं गरजेचं होत. नाथाभाऊ आणचे चांगले मित्र आहेत. पण, आता जिथे गेलेत, तिथं त्यांनी सुखी राहावे, असेही रावसाहेब दानवेंनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-