खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा निघाला फुसका बार !

eknath khadse

जळगाव : भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांना सोयीस्करपणे राजकारणातुन डावलण्यात आल्याचे आरोप खुद्द त्यांनीच काही भाजप नेत्यांवर लावले होते. यानंतर अनेक वेळा देवेंद्र फडणवीस यांच्यावर असलेल्या नाराजीची खदखद त्यांनी माध्यमांमध्ये व्यक्त केली होती. मात्र, भाजप पक्षाला अडचणीच्या काळात उभारी देणाऱ्या नेत्यांपैकी एक असल्याने पुन्हा सक्रिय होण्याची संधी मिळेल या आशेवर एकनाथ खडसे अजूनही भाजपमध्येच आहेत.

नुकताच एकनाथ खडसे यांनी अचानक मुंबई दौरा केला होता. त्यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार देखील मुंबईत असल्याने त्यांची भेट होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, भेट न घेताच खडसे मुक्ताईनगरला परतले. अशातच, माजी आमदार उदयसिंग पाडवी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर मोठा गौप्यस्फोट केला होता. ‘घटस्थापनेच्या मुहूर्तावर आमचे नेते व मार्गदर्शक एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करतील’ असे विधान त्यांनी केले होते.

तर, खडसे समर्थकांनी देखील पक्ष सोडून योग्य निर्णय घ्यावा अशा मागणीचा सूर वाढत होता. काल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील स्थानिक कार्यकर्त्यांनी खडसेंची भेट घेतल्यानंतर खडसेंच्या पक्षप्रवेशावर जवळजवळ शिक्कामोर्तब झाल्याचं बोललं जात होतं. तर, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकनाथ खडसेंच्या पदावरून व आमदारकी वरून चाचपणी देखील पूर्ण झाली असून घटस्थापनेच्या मुहूर्तावर खडसे आपल्या सर्मथकांसह प्रवेश करणार अशा चर्चांना उधाण आलं होत. मात्र खडसेंनी पुन्हा एकदा पक्ष बदलावर हुलकावणी दिली आहे.

राष्ट्रवादी प्रवेशाच्या मुहूर्तावर खडसे म्हणतात…

खडसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर त्यांना ठाकरे सरकारमध्ये थेट कृषिमंत्रीपद मिळणार असल्याचं सूत्रांतर्फे सांगण्यात आलं होतं. दरम्यान, “राष्ट्रवादी प्रवेशाबाबत मला काहीच बोलायचे नाही, नो कमेंट्स” अशी प्रतिक्रिया देत आळीमिळी गुपचिळी कायम ठेवली. तर, “माझ्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबतचे सारे मुहूर्त तुमचेच आहेत”, असा टोला देखील त्यांनी लगावला.

महत्वाच्या बातम्या-