पक्षाने मंत्रिपद दिल्यास जबाबदारी घ्यायला तयार; खडसेंचा युटर्न

Eknath-Khadse

मुंबई – भूखंड घोटाळ्याचा आरोप झाल्यानंतर मंत्रिपद गमावलेल्या एकनाथ खडसे यांना बराच काळ मंत्रिपदापासून दूर राहावे लागले. दरम्यान भूखंड घोटाळ्यात क्लिनचीट मिळाल्यानंतर नाथाभाऊंचा मंत्रिपदाचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र खडसे यांनी काल एका वृत्तसंस्थेला मुलाखत देताना आपण भाजप सोडणार नाही मात्र मंत्रिपद स्वीकारनार नसल्याचं त्यांनी म्हंटल होतं.दरम्यान आज खडसे यांनी आपल्या या वक्तव्यावरून युटर्न घेत पक्षाने मंत्रिपद दिल्यास आपण जबाबदारी स्वीकारण्यास तयार असल्याचं म्हंटलं आहे.

खडसे काल म्हणाले होते की ‘एक वर्षाने राज्यात विधानसभेची निवडणूक आहे. तसेच स्थानिक निवडणुकाही होत आहेत. त्यामुळे मला त्या दृष्टिने तयारी करायची आहे. त्यामुळे मला आता मंत्रिमंडळात परण्याची कोणतीही इच्छा नाही. खूप काम करायचे आहे.” मात्र खडसे यांनी आपल्या या वक्तव्यावरून आज युटर्न घेतल्याचे पाहायला मिळत आहे.