खडसे समर्थक देत आहेत कॉंग्रेस नेत्याला आमदार होण्याच्या शुभेच्छा

eknath khadse

टीम महाराष्ट्र देशा : यावल तालुक्यातील काँग्रेसचे माजी आमदार शिरीष चौधरी हे भावी आमदार असून ते आगामी विधानसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्क्याने निवडून येतीलच, असे वक्तव्य माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे कट्टर समर्थक, तथा विद्यमान भाजप नगरसेवक अतुल पाटील यांनी केल्याने यावल तालुक्यातील राजकीय गोटात मोठी खळबळ उडाली आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये भाजपात उभी फूट असल्याच सर्वांनाचं ज्ञात आहे तर रावेर मतदारसंघदेखील त्यास अपवाद नाही. त्यातल्या-त्यात यावल शहरात तर भाजपा पक्षांतर्गत बाजार समितीपासूनच वादाची ठिणगी पडली आहे.

दरम्यान, माजी मंत्री खडसे यांचे कट्टर समर्थक, नगरसेवक अतुल पाटील हे सरळ-सरळ विद्यमान आमदार हरीभाऊ जावळेंचा विरोध करतांना दिसत आहे. फैजपूर रस्त्यावरील नेवे मंगल कार्यालयात एका सार्वजनिक कार्यक्रमात अध्यक्षस्थानी माजी आमदार शिरिष चौधरी होते तर प्रमुख उपस्थितीत पंचायत समितीचे गटनेता शेखर पाटील, माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे कट्टर समर्थक अतुल पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

या कार्यक्रमात नगरसेवक अतुल पाटील यांनी आपल्या भाषणात भावी आमदार म्हणुन शिरीष चौधरी यांचा उल्लेख केला व ते सुसंस्कृत कुटुंबातील व्यक्ती असुन शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे, सर्व समाजाला घेवून चालण्याची त्यांची भूमिका आहे तर ते मतदारसंघात ते निवडून येतील, असे वातावरणत असून तेच आमदार होतील, असा विश्वास आहे, असे पाटील यांनी म्हणताच टाळ्यांचा कडकडाट झाला तर या वक्तव्यानंतर भाजपाच्या राजकीय गोटात मोठी खळबळ उडाली आहे. पाटील यांचे हे वक्तव्य म्हणजे ते भाजपाचे असतांना विद्यमान आमदार हरीाऊ जावळे यांच्या विरूध्द उघड विरोध केल्याचे दिसुन येते.