एकनाथ खडसे यांचा ‘अन्याय’ रिक्षातून प्रवास

eknath khadase anyay

धुळे : माजी महसूल मंत्री आणि भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी बुधवारी धुळे शहरात येऊन चक्क मागे अन्याय फलक लिहिलेल्या रिक्षातून शहरातून प्रवास केला . एकनाथ खडसे यांच्यावर अन्याय होत असल्याची भावना त्यांच्या कार्यकर्त्यांची आहे याच भावनेचं प्रतिक असलेल्या रिक्षातून प्रवास करत कार्यकर्त्यांच्या भावनांना प्रतिसाद देत त्यांनी हा प्रवास केला.’आपल्यावरील अन्यायाला कार्यकर्ते वाचा फोडत आहे’, असा टोला खडसेंनी यावेळी लगावला.

भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर खडसे यांच्यापासून पक्षाने अंतर राखण्याचं धोरण स्वीकारलं आहे. या पार्श्वभूमीवर खडसे यांच्यावर अन्याय होत असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये वाढीला लागली आहे. अमळनेर येथील कैलास चौधरी खड्सेंवरील अन्यायाचा निषेध म्हणून रिक्षाच्या मागे माजी मंत्री खडसे यांचे छायाचित्र व त्यावर अन्याय असे लिहिलेला फलकही लावला आहे. खडसे जेव्हा धुळ्यात आले तेव्हा कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव त्यांनी कैलास चौधरी यांच्या रिक्षातून सवारी करत यावेळी शहरात फेरफटका मारला. अन्याय रिक्षातून प्रवास करून खडसे यांनी एकप्रकारे कार्यकर्ते जे विचार करत तो योग्यच असल्याचा संदेश दिला आहे. ‘आपल्यावरील अन्यायाला कार्यकर्ते वाचा फोडत आहे’, असा टोला खडसेंनी यावेळी लगावला.