नाथाभाऊंच्या मनात नेमकं चाललंय तरी काय ? पवारांच्या भेटीनंतर खडसे उद्धव ठाकरेंच्या भेटीला !

eknath khadse

टीम महाराष्ट्र देशा : गेल्या काही दिवसांपासून भाजपावर नाराज असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे पक्षश्रेष्ठींना भेटण्यासाठी गेले दिल्लीत होते. मात्र पक्षश्रेष्ठींशी त्यांची भेट होऊ शकली नाही. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीसाठी त्यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी वळविला. त्यानंतर आता खडसे शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे नाथाभाऊंच्या मनात नेमकं चाललंय तरी काय ? असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित झाला आहे.

आज तब्बल तासभर पवार आणि खडसे या दोघांमध्ये चर्चा झाली. त्यानंतर ते बाहेर आले. मात्र त्यांनी माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया दिल्या नाही. त्यानंतर खडसे पक्षश्रेष्ठींना न भेटताच मुंबईला जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे खडसे वेगळा निर्णय घेतात कि काय ? अशी शंका व्यक्त केली जात आहे. दरम्यान पवारांना भेटण्यापूर्वी त्यांनी माध्यमांसमोर आपली खदखद व्यक्त केली.

खडसेंनी परवाचं स्पष्ट शब्दांत त्यांची नाराजी व्यक्त करत पक्षाकडून असाच अन्याय होत राहिल्यास मला वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा दिला होता. तसेच ”पक्षात राहून ज्यांनी पक्ष विरोधी कामे केली आहेत. त्यांचे ऑडियो आणि व्हिडीओ पुरावे माझ्याकडे आहे. ते मी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे दिले आहेत. मात्र मी गेले ४० वर्ष मी भाजपमध्ये आहे. मी पक्षाशी एकनिष्ठ असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

तसेच विधानसभा निवडणुकांच्यावेळी अचानक मला तिकीट नाकारले गेले. तर माझ्या मुलीला उमेदवारी देत पक्षानेच तिचा जाणीवपूर्वक पराभव केला गेला. विधानसभा निवडणुकीच्या वेळी मला राष्ट्रवादी कॉंग्रेस कडून राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढण्यासाठी ऑफर आली होती. मात्र मी ती स्पष्टपणे नाकारली. असे स्पष्टीकरणही त्यांनी यावेळी दिले.

महत्वाच्या बातम्या