fbpx

खडसे आक्रमक! गिरीश बापटांचे धाबे दणाणले

एकनाथ खडसे

टीम महाराष्ट्र देशा: भाजप नेते एकनाथ खडसे यांनी काही दिवसांपूर्वी ‘आज तर भाजप मध्ये उद्याच माहित नाही’ अस वक्तव्य केलं होत. त्यामुळे किंचित तरी एकनाथ खडसे यांचे भाजप विरोधी मत स्पष्ट झाले होते. तसेच आता पुन्हा मंत्रिमंडळात प्रवेश अशक्य झालेल्याने खडसेंच्या जिव्हारी आले असून त्यांनी भाजप विरोधी आक्रमक पवित्र घेत. भुसावळ येथील शासकीय गोदामावर धाड घालून तेथील धान्य घोटाळा उघडकीस आणला.

भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी भुसावळ येथील शासकीय गोदामावर धाड घालून अनेक राजकीय दिग्गजांना तोंडात बोट घालण्यास भाग पाडले. या घोटाळ्याला केवळ अधिकारी जबाबदार नसून बडे राजकीय नेतेही जबाबदार असल्याचा आरोप खडसे यांनी केल्याने अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट अडचणीत आले आहेत. त्यांची नावेही मध्यंतरी माध्यमांमध्ये छापून आली होती, असेही  खडसे यांनी ठणकावले. खडसेंच्या आरोपानंतर बापट यांनी मुंबईहून भरारी पथक जळगावला रवाना केले. हे पथक गोडाऊन सील करून कागदपत्रांची तपासणी करणार आहे. या प्रकरणाची तीन दिवसात विभागाअंतर्गत चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचेही बापट यांनी स्पष्ट केले आहे. एकनाथ खडसे यांनी घातलेल्या धाडीत प्रत्येक पन्नास किलोच्या गोणीतील १० ते १२ किलो धान्य चोरी होत असल्याचे समोर आले आहे.