खडकीत दारुगोळा कारखान्यात स्फोट; दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू

पुणे: खडकी येथील दारुगोळा कारखान्यात स्फोटक वस्तू एका जागेवरून दुस-या जागेवर वाहून नेत असताना झालेल्या अपघातात दोन कामगारांचा रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाला आहे. अशोक काशिनाथ डुबल (वय 48) व यश मारिया रॉक (वय 50, दोघे रा. खडकी) अशी या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कामगारांची नावे आहेत. ही घटना आज ( गुरुवारी) सकाळी नऊ वाजून 20 मिनिटांच्या दरम्यान घडली आहे. 
 
खडकी येथे संरक्षण खात्याचा दारुगोळा कारखाना आहे. या कारखान्यात कामगार नेहमीप्रमाणे काम करत होते. अचानक सव्वानऊच्या सुमारास स्फोट झाला. या स्फोटात दोन कामगारांचा मृत्यू झाला. तर या दुर्घटनेत अन्य दोन कामगार जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 
अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान खडकी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.