खडकवासलाची पुनरावृत्ती पालघरमध्ये, तेव्हा हर्षदा वांजळे पराभूत तर आज श्रीनिवास वनगा

shreeniwas wanga and harshada wanjle

टीम महाराष्ट्र देशा: पालघर लोकसभा पोटनिवडणूकीत भाजपचे राजेंद्र गावित यांनी शिवसेनेच्या श्रीनिवास वनगा यांचा पराभव केला आहे, दिवंगत भाजप खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे येथे पोटनिवडणूक घेण्यात आली होती, दरम्यान, २०११ मध्ये पुण्यातील खडकवासला मतदारसंघात घडलेल्या नाट्यमय राजकारणाची पुनरावृत्ती पालघरमध्ये घडली आहे.

Loading...

२०११ साली मनसेचे सोनेरी आमदार रमेश वांजळे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या खडकवासला विधानसभेसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली होती, कधीकाळी राष्ट्रवादी कॉंग्रेसने उमेदवारी नाकारलेल्या रमेश वांजळे यांनी मनसेच्या तिकिटावर येथून विजय मिळवला होता. मात्र, वांजळे यांच्या निधनानंतर पुण्याचे तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांनी राजकीय खेळी करत वांजळे यांच्या पत्नी हर्षदा वांजळे यांना उमेदवारी जाहीर केली. मनसेकडून उमेदवारी मिळत असताना देखील हर्षदा वांजळे यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवली, त्यामुळे नाराज मनसेने उघडपणे विरोध केला नाही. मात्र, या निवडणुकीत हर्षदा वांजळे पराभूत झाल्या. भाजपचे भीमराव तापकीर यांनी त्यांच्या पराभव केला होता.

आता पालघरमध्ये देखील खडकवासलाची पुनरावृत्ती झाली आहे, भाजपचे प्राबल्य नसताना देखील दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांनी पालघरमध्ये कमळ फुलवले होते. चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर शिवसेनेने खेळी करत त्यांचे पुत्र श्रीनिवास वनगा यांना पक्षात घेत उमेदवारी दिली, भाजपने शेवटच्या क्षणापर्यंत गयावयाकरून देखील शिवसेनेने आपली उमेदवारी कायम ठेवली. त्यामुळे दोन्ही पक्षांनी हि निवडणूक प्रतिष्ठेचा विषय बनवली. एका बाजूने उद्धव ठाकरे तर दुसरीकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अक्षरश एकमेकांची चिरफाड केल्याचं पहायला मिळालं. मात्र,अखेर मतदारांनी भाजपच्या बाजूने कौल दिला आहे.Loading…


Loading…

Loading...