खडकवासला धरण पूर्ण भरलं, दोन हजार 568 क्युसेकचा विसर्ग मुठा नदीत सुरु

पुणे : पुण्यात सुरु असलेल्या पावसानं खडकवासला धरण पूर्ण भरलं असून धरणातून दोन हजार 568 क्युसेकचा विसर्ग मुठा नदीत सुरु आहे. गेल्या 24 तासांत पुण्याच्या धरण क्षेत्रात पडलेला पाऊस याप्रमाणे… खडकवासला 37 मिलीमीटर, पानशेत आणि वरसगाव 56 मिलीमीटर, आणि; टेमघर 137 मिलीमीटर. सर्व धरणांमधला एकंदर पाणीसाठा 39 पूर्णांक 54 टक्के झाला आहे.

खडकवासला धरण पूर्ण भरले. बुधवारी (दि. १०) रात्री उशिरा ५०० क्युसेक्स पाणी नदी पात्रात सोडण्यात आले आहे. धरण क्षेत्रात पाऊस अजुनही सुरु असल्यामुळे आणखी पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन कार्यकारी अभियंता पी. बी. शेलार यांनी केले आहे.Loading…
Loading...