खडकवासला धरण १००% भरले, महापौरांनी केले जलपूजन

पुणे : पुण्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनला होता. धरणांमध्ये पाणीसाठा कमी झाल्यामुळे पुणेकरांवर पाणी संकट आले होते. मुंबई, नाशिक, पुण्यासह राज्यात अनेक भागात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पुण्यातही मागील आठवड्यापासून जोरदार पाऊस सुरू असून, त्यामुळे पुण्याला पाणीपुरवठा करणारे खडकवासला धरण शंभर टक्के भरलं आहे. खडकवासला धरण भरल्यानंतर आता मुठा नदीपात्रातून पाण्याचा विसर्गही सुरू केला आहे.

आज पुण्यात खडकवासला धरणात जल पूजन करण्यात आलं. पुणेकरांच्या वतीनं महापौर मुक्ता टिळक आणि आमदार भीमराव तपकीर यांनी हे जलपूजन केलं. दरम्यान, यावेळी नगरसेविका राणी भोसले, वृषाली चौधरी, राजश्री नवले, नीता दांगट, सरस्वती शेंडगे, मनीषा लडकत, अल्पना वरपे, मनीषा कदम आणि नगरसेवक मा.दिलीप वेडे पाटील तसेच महापालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व्ही.जी.कुलकर्णी, नंदकुमार जगताप, मनीषा शेकटकर, जलसंपदा विभागाचे आणि संबंधित खात्याचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
अधिवेशन सुरु असतानाच मनसेला मोठा धक्का,'या' बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश
जावयाला अडचण झाली तर मुलीलाही अडचण होणार हे लक्षात असुद्या - शिवेंद्रराजे भोसले
राज ठाकरे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायला मैदानात उतरत असतील तर त्यांचे स्वागतचं...
...अखेर प्राजक्त तनपुरेंचा राजीनामा
मंत्री अशोक चव्हाण यांचा खरा चेहरा उघड; रयत क्रांतीकडून टीका
'देवेंद्र फडणवीस जगातील सर्वांत खोटारडे नेते'
मनसेच्या झेंड्यावरून वाद,मराठा क्रांती मोर्चा करणार खटला दाखल
रोहितदादा पवार मानले राव या माणसाला ! मुंबईच्या डबेवाल्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी झाला ' एक दिवसाचा मुंबईचा डबेवाला '
बीड: भाजप-राष्ट्रवादीत राडा; सरपंचाला चोपले