मुंबई : कन्नड सिनेसृष्टीतील सुपरस्टार यशचा बहुचर्चीत चित्रपट ‘केजीएफ-2’ हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झालाय. नुकतंच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. यश, संजय दत्त , रवीना टंडन हे कलाकार या सिनेमात पहायला मिळणार आहेत. यश, संजय दत्त, रवीना टंडन आणि चित्रपटाचा निर्माता करण जोहर यांनी चित्रपटाच्या ट्रेलर लाँचला हजेरी लावली. आता अखेर हा सिनेमा हा चित्रपट 14 एप्रिल रोजी रिलीज होणार आहे.
या चित्रपटात संजय खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे तर रवीना टंडन रामिका सेन नावाच्या नेत्याच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे हा अॅक्शन मुव्ही बॉक्सऑफिसवरही कमाल करणार हे नक्की.
या ट्रेलरला चार कोटी चार लाखांहून अधिक लोकांनी पाहिलंय.या ट्रेलरच्या कमेंट बॉक्समध्ये एक लाखाहून अधिक कमेंट पहायला मिळत आहेत. अनेकांनी कमेंट करून सिनेमाबाबत उत्सुकता असलयाचं म्हटलंय. एकाने “14 तारीख कधी उजाडतेय याची मी खूप मनापासून वाट बघतोय. फर्स्ट डे फर्स्ट शो बघणार आहे”, असं म्हटलंय. तर दुसरा म्हणतो “मी यशचा खूप मोठा फॅन आहे त्याच्यासाठी मी हा सिनेमा बघणार आहे.” तर तिसऱ्याने म्हटलं “संजय दत्तचा लूक आणि त्याचे डोळे मला थिएटरपर्यंत खेचत नेत आहेत.”
केजीएफ 2 हा सिनेमा मागच्या दोन वर्षापासून प्रदर्शनासाठी रखडला आहे. केजीएफ 2 चित्रपट 2020 मध्ये प्रदर्शित होणार होता, परंतु कोरोनामुळे चित्रपटाची तारीख पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर हा चित्रपट 16 जुलै 2021 रोजरी प्रदर्शित होणार होता. ही तारीखही पुढे ढकलण्यात आली. आता अखेर हा सिनेमा हा चित्रपट 14 एप्रिल रोजी रिलीज होणार आहे.
महत्वाच्या बातम्या :