Share

VIDEO : तू खरं सोनं आहेस..! ‘मिडनाइट रनर’ प्रदीपच्या संघर्षाला क्रिकेटपटूंनी ठोकला सलाम!

नवी दिल्ली :  खांद्यावर बॅग घेऊन रात्री उशिरा नोएडाच्या रस्त्यावर धावत असलेल्या प्रदीप मेहराचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ट्विटरसह सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रदीपच्या संघर्षाची कहाणी वाचण्यासाठी लोक उत्सुक आहेत. काही लोक त्याच्या शौर्याला आणि निस्वार्थीपणाला सलाम करत आहेत, तर काही लोक त्याला सर्वतोपरी मदत करायला तयार आहेत. अनेक बड्या व्यक्तींनीही प्रदीपला सलाम केला आहे.

क्रिकेटर हरभजन सिंगने ट्वीट करून म्हटले, ”अशा प्रकारे चॅम्पियन बनवले जातात…मग ते खेळाचे मैदान असो किंवा आयुष्यात आणखी काही करायचे असो, तो विजेता असेल. हा व्हिडिओ शेअर केल्याबद्दल विनोद धन्यवाद. खरे तर हे शुद्ध सोने आहे.”

इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केविन पीटरसननेही प्रदीपच्या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे. “ही गोष्ट तुम्हाला नवी सुरुवात करून देईल”, अशा आशयाचे कॅप्शन पीटरसनने आपल्या ट्वीटमध्ये दिले आहे.

https://twitter.com/KP24/status/1505791422485733377?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1505791422485733377%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fndtv.in%2Fcricket%2Fkevin-pietersen-reacts-to-video-of-indian-teens-10-km-midnight-run-hindi-2833982

https://twitter.com/mipaltan/status/1505934084614209543

पाठीवर बॅग घेऊन रात्री १२ वाजता नोएडाच्या रस्त्यावर धावत असलेल्या प्रदीप मेहराला चित्रपट निर्माते विनोद कापरी यांनी आपल्या कारमधून घरी सोडण्याची ऑफर दिली होती, परंतु वारंवार विनंती करूनही प्रदीप कारमध्ये बसण्यास तयार झाला नाही. खरे तर, १९ वर्षांचा प्रदीप मॅकडोनाल्ड कंपनीत नोकरी पूर्ण केल्यानंतर रोज धावण्याचा सराव करतो, कारण त्याचे स्वप्न सैन्यात भरती होण्याचे आहे. प्रदीप हा उत्तराखंडमधील अल्मोडा जिल्ह्यातील रहिवासी आहे. तो नोएडामध्ये त्याच्या मोठ्या भावासोबत राहतो. त्याची आई रुग्णालयात दाखल आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

नवी दिल्ली :  खांद्यावर बॅग घेऊन रात्री उशिरा नोएडाच्या रस्त्यावर धावत असलेल्या प्रदीप मेहराचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल …

पुढे वाचा

Marathi News Sports