मुंबई : अभिनेत्री केतकी चितळे ही आपल्या वादग्रस्त पोस्टमुळे नेहमी चर्चेत असते. याआधीही शरद पवारांचा अपमान करणारी पोस्ट केतकी चितळे हिने केली होती. आता पुन्हा एकदा शरद पवारांवर वादग्रस्त पोस्ट केतकी चितळे हिने केली होती. यानंतर केतकी चितळेविरोधात कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी काल रविवारी सकाळी ठाणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते.
केतकी चितळे हिने कोणताही वकील घेतला नव्हता. तिने न्यायालयात स्वत:च युक्तिवाद केला. यावेळी तिने आपण राजकीय व्यक्ती नसल्याचे सांगितले. मला समाज माध्यमांवर माझे स्वत:चे मत मांडायचा अधिकार नाही का, असा सवालही तिने विचारला. हे सर्व ऐकून घेतल्यानंतर सत्र न्यायालयाने केतकी चितळेला तीन दिवसांची म्हणजेच १८ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
कोर्टात केतकी चितळे काय म्हणाली?
“ती पोस्ट माझी नाही. ती मी सोशल मीडियातून कॉपी करुन पोस्ट केली होती. सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करणं गुन्हा आहे का? असा सवाल केतकी चितळेने उपस्थित केला. केतकीने सुनावणीदरम्यान वकील घेतला नाही, ती स्वतः कोर्टात युक्तिवाद केला. केतकीनं सांगितलं की मी या पोस्ट मी डिलीट करणार नाही. माझा तो अधिकार आहे”.
नऊ ठिकाणी गुन्हे दाखल –
आतापर्यंत एकूण नऊ ठिकाणी तिच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आज मुंबईतील पवई पोलीस ठाण्यात आणि अमरावतीतल्या गाडगे नगर पोलीस ठाण्यात आणि नाशिक सायबर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. यापूर्वी कळवा, पुणे, पिंपरी-चिंचवड, धुळे, सिंधुदुर्ग, अकोला, मुंबईतील गोरेगाव पोलीस ठाण्यात केतकी चितळेविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता.
महत्वाच्या बातम्या –