‘महाविकास आघाडीची पूर्ण ताकद पण पंढरपुरात भाजपचा आमदार, हा जनतेचा कौलच !’

पंढरपूर : अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीचा आज निकाल लागणार आहे. पंढरपुरात आता निकालाचे चित्र हे जवळजवळ स्पष्ट झालं आहे. भाजपने मोठी आघाडी घेतली असून राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव निश्चित झाला आहे.

राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या आणि राष्ट्रवादीसह भाजपनेही प्रतिष्ठेच्या केलेल्या या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे. राष्ट्रवादीने भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली असून भाजपने त्यांच्याविरोधात समाधान आवताडे यांना उभं केलं आहे. वंचित बहुजन आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह एकूण 19 उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरले असले तरी खरी लढत ही भालके आणि आवताडेंमध्येच झाली आहे.

भारतनानांच्या निधनामुळे त्यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांच्यामागे सहानुभूती असल्याने त्याचा त्यांना मोठा फायदा होईल अशी शक्यता वर्तवली जात असली तरी समाधान आवताडे यांनी मात्र मोठी आघाडी मिळवली आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह काँग्रेस आणि शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांनी भालकेंच्या प्रचारासाठी जोर लावला होता.

समाधान आवताडे यांच्या मोठ्या आघाडीनंतर भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडलं आहे. ‘महाविकास आघाडीची पूर्ण ताकद, अजित पवार ठाण मांडून बसलेले, टप्प्यात आल की गेम करण्याची भाषा करणारे जयंत पाटील यांचे दौरे, नाना पटोले यांच्या सभा अशातच प्रशासनाचा फौजफाटा साम,दाम,दंड,भेद, सगळ करूनही जनतेने नाकारले. पंढरपूरात भाजपाचा आमदार हा राज्य सरकारविरोधातील जनतेचा कौलच,’ असा घणाघात केशव उपाध्ये यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या

IMP