मुंबई : राज्याचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे (Sitaram Kunte) यांनी ‘ईडी’समोर महत्त्वपूर्ण खुलासा केला असून कुंटे गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव असताना अनिल देशमुख(Anil Deshmukh) पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीची अनधिकृत यादी पाठवत आहे, असा गंभीर आरोप सीताराम कुंटे यांनी केला आहे. ७ डिसेंबर रोजी मनी लाँड्रिंगप्रकरणी तपास करत असताना कुंटे यांनी ही माहिती ईडीला दिली आहे.कुंटे यांनी देशमुख यांच्या हस्तक्षेपाची कबुली दिल्यामुळे भाजपकडून पुन्हा एकदा महाविकासआघाडी सरकारवर निशाणा साधण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते केशव उपाध्ये(Keshav Upadhye) यांनी मविआ सरकारवर टीका केली आहे.तसेच अनिल देशमुखांची पाठराखण करणारे शरद पवार आता काय बोलणार?, असा सवालही उपाध्ये यांनी केला आहे.
यासंदर्भात केशव उपाध्ये यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘राज्याचे तत्कालिन गृहमंत्रीच बदल्यांची अनधिकृत यादी देत होते. अनिल देशमुखांची पाठराखण करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार आता काय बोलणार?’, असा सवाल उपाध्ये यांनी केला आहे. तसेच महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार म्हणजे खंडण्या आणि बदल्या, असेही केशव उपाध्ये म्हणाले आहेत.
राज्याचे तत्कालिन गृहमंत्रीच बदल्यांची अनधिकृत यादी देत होते . अनिल देशमुखांची पाठराखण करणारे @PawarSpeaks आता काय बोलणार? महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार म्हणजे खंडण्या आणि बदल्या pic.twitter.com/szswRk9m3m
— Keshav Upadhye (@keshavupadhye) January 29, 2022
दरम्यान, कुंटे यांनी ईडीला सांगितले की, अनिल देशमुख हे गृहमंत्री असतांना मला पोलिसांच्या बदल्यांसाठी अनधिकृत याद्या पाठवायचे. यामध्ये संबंधित पोलीस अधिकाऱ्याची कुठल्या जागी आणि कोणत्या पदावर बदली करायची, हे नमूद केलेले असायचे. अनिल देशमुख यांचा स्वीय सहायक संजीव पालांडे यांच्यामार्फत या अनधिकृत याद्या माझ्यापर्यंत पोहोचवल्या जात असत. मी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अधीन काम करत असल्याने संबंधित याद्या स्वीकारण्यास नकार देऊ शकत नव्हतो. त्यामुळे पोलीसांच्या बदल्या करताना या नावांचा समावेश केला जायचा,’ असे कुंटे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
“अनिल देशमुख पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीची अनधिकृत यादी पाठवत होते”, सीताराम कुंटेंचा गंभीर आरोप
“दूध का दूध म्हणणाऱ्या अनिल देशमुखांमागे खरे सूत्रधार कोण?”, अतुल भातखळकरांचा सवाल
‘मास्कमुक्त महाराष्ट्र’ चर्चेवर अजित पवारांनी दिले स्पष्टीकरण; म्हणाले…
‘ठाकरे सरकारचा वसुलीचा धंदा…,’ कुंटेंनी केलेल्या खुलास्यानंतर सोमय्यांचे टीकास्त्र
“वाईन विक्रीचा निर्णय संजय राऊत शेतकरी हिताचा सांगताहेत, जनता एवढी दुधखुळी नाही”