मुंबई : ‘मुख्यमंत्री बनणं हे माझं कधीच स्वप्न नव्हतं. मी मुख्यमंत्री होईन असं कधी वाटलंही नव्हतं, पण महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं आणि मी मुख्यमंत्री झालो. आता मी असेपर्यंत सीएम माझ्या पक्षाचा होत राहिन, हे ही माझं स्वप्न आहे’, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) भारतीय विमा कर्मचारी सेना महासंघाच्या रौप्य महोत्सवात बोलत असतांना म्हणाले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावर आता भाजप नेते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी टीका केली आहे.
यासंदर्भात केशव उपाध्ये यांनी फेसबुक पोस्ट शेअर केली असून ते म्हणाले आहेत की,‘मुख्यमंत्री बनण्याचं आपल स्वप्न नव्हतं. मुख्यमंत्री होईन असंही वाटलं नव्हतं, असा दावा वर्क फ्रॅाम होम फेम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला. पण तुमची मुख्यमंत्री होण्याची अनेक वर्षांपासून सुप्त इच्छा होती. हे सर्वांनाच माहिती आहे. बाकी मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसवल्याबद्दल तुम्ही थोरल्या पवार साहेबांचे आभार मानले पाहिजेत.’
https://m.facebook.com/story.php?story_fbid=2080709842102686&id=234379736735715&sfnsn=wiwspwa
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,‘यापुढे शिवसेनेचाच मुख्यमंत्री होत राहिला पाहिजे, असंही स्वप्न तुम्ही पाहताय म्हणे. मुळात त्यासाठी विश्वासघाताने नाही तर स्वबळावर आमदार निवडून आणावे लागतात किंवा तसं स्वप्न पाहण्यासाठी तुम्ही पवार साहेबांची परवानगी घेतलीय का? नाहीतर असं काही थोरले पवार कोपले तर पाच वर्षे पूर्ण करणंही कठीण व्हायचं, मुख्यमंत्रीपदासाठी त्यांचीही काही (सु)प्रिय स्वप्नं आहेतच की! बाकी आता कुणी कितीही स्वप्नं पाहिली तरी पुढचा मुख्यमंत्री राज्यातील जनताच ठरवणार आहे आणि यावेळी मतदार निकालानंतर तिघाड्या तयार होणार नाहीत याचीही खबरदारी घेईल एवढं लक्षात ठेवा’, अशी टीका केशव उपाध्ये यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “…तर ते आमच्यावरही हल्ला करू शकतात”; रवी राणांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
- VIDEO : आता फक्त मोजत राहायचं..! पाकिस्तानच्या आफ्रिदीला षटकार खेचत चेतेश्वर पुजारानं ठोकलं सलग चौथं शतक
- गुणरत्न सदावर्तेंची राजकारणात एन्ट्री, राष्ट्रवादी काँग्रेसच्याविरुद्ध ठोकणार शड्डू!
- “मी मुख्यमंत्र्यांना आव्हान देते की…”, रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर नवनीत राणा यांची पहिली प्रतिक्रिया
- IPL 2022 CSK vs DC : मॅचच्या काही तासांपूर्वी दिल्ली कॅपिटल्समध्ये पुन्हा शिरला कोरोना; गोलंदाजाला केलं क्वारंटाइन!