‘२२ वर्षांपूर्वी पवारांनी घेतलेला मोठा निर्णय म्हणजे संघर्ष न करता सत्ता हेच धोरण’

keshav upadhye

मुंबई : १० जून १९९९ साली शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली होती. यानंतर, काँग्रेसच्याच सोबत राहून महाराष्ट्राच्या सत्तेत अनेक वर्षे राष्ट्रवादीने सहभाग घेतला. आता तर कोणीही कल्पना न केलेली अशी आघाडी असून राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसने एकत्र येऊन महाविकास आघाडीचं सरकार राज्यात स्थापन केलं आहे.

दरम्यान, आज राष्ट्रवादीचा २२ वा वर्धापन दिन साजरा केला गेला असून कोरोना संकटच भान राखून मर्यादित स्वरूपात हा कार्यक्रम पार पडला आहे. आज मुंबईतील पक्ष कार्यालयात बोलताना शरद पवार म्हणाले, आपण २२ वर्षांपूर्वी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आणि संघर्षाची भूमिका स्वीकारली. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने या २२ वर्षांचा आढावा आपण घेतोय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हे वैशिष्ट्य राहिले की तुमच्या साऱ्यांच्या कष्टाने आणि जनतेच्या बांधीलकीने आज आपण २२ वर्षे आणि दिवसेंदिवस जनमानसात आपली शक्ती वाढवण्यासाठी आणि त्यांचा विश्वास संपादित करण्यात यशस्वी झालो.’

आता यावरून भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शरद पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसवर अत्यंत बोचरी टीका केली आहे. ’22वर्षांपूर्वी कोणता महत्त्वाचा निर्णय? तर सोनिया गांधीच्या विदेशीपणाचा पण लगेच सत्तेसाठी मुद्दा सोडून दिला. संघर्ष केला कधी? जो निर्णय घेतला तो गुंडाळला व काँग्रेससोबत सत्तेत सहभागी. आताही ज्या शिवसेनाविरोधात लढलात त्यांच्यासोबत सत्तेत सहभागी म्हणजे सत्ता हेच धोरण,’ अशी टीका केशव उपाध्ये यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या