मुंबई : भूतकाळातील घडामोडींपासून धडा घेत गोवा काँग्रेसने शनिवारी(२२ जाने.) विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांना मंदिर,दर्गा आणि चर्चमध्ये दर्शनासाठी नेले. तसेच येथे उमेदवारांना निवडणूक जिंकल्यानंतर पक्ष सोडणार नाही, अशी शपथ देण्यात आली. २०१७ पासून आत्तापर्यंत १७ पैकी १५ आमदार काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळेच कदाचित भूतकाळाची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी त्यांनी त्यांच्या ३६ उमेदवारांना महालक्ष्मी मंदिर, बांबोलीम क्रॉस आणि बेटिन मशीद येथे नेले. दरम्यान, या मुद्द्यावरून आता भाजप नेते केशव उपाध्ये यांनी काँग्रेसवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.
यासंदर्भात केशव उपाध्ये यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,’गोव्यात कॉँग्रेसने उमेदवारांना चर्च, मंदिर, दर्गा येथे नेऊन निवडून आल्यावर न फुटण्याची शपथ दिली, म्हणजेच गोवा काँग्रेसचा आपल्या उमेदवारांवर विश्वास नाही ते फुटणार याची खात्री असावी म्हणून ही धडपड? जे आपल्या उमेदवारावर विश्वास टाकू शकत नाहीत त्यांच्यावर जनता कसा विश्वास टाकणार?’, असा सवालही उपाध्ये यांनी केला आहे.
गोव्यात @INCIndia ने उमेदवारांना #चर्च #मंदीर #दर्गा येथे नेऊन निवडून आल्यावर न फुटण्याची शपथ दिली, म्हणजेच @INCGoa चा आपल्या उमेदवारांवर विश्वास नाही ते फुटणार याची खात्री असावी म्हणून ही धडपड? जे आपल्या उमेदवारावर विश्वास टाकू शकत नाहीत त्यांच्यावर जनता कसा विश्वास टाकणार?
— Keshav Upadhye (@keshavupadhye) January 23, 2022
दरम्यान, धार्मिक स्थळांवर नेऊन उमेदवारांना शपथ दिल्यानंतर काँग्रेसने म्हंटले आहे की,’काँग्रेसला मिळालेले मत म्हणजे भाजपला मिळालेले मत असा आभास निर्माण होत असल्याने सर्व उमेदवारांनी शपथ घेतली.’ काही दिवसांपूर्वी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि AITC (ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस) चे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी काँग्रेसला मतदान करणे म्हणजे भाजपला मतदान करण्यासारखेच आहे, अशी टीका केली होती.
महत्वाच्या बातम्या:
- “आर.आर.आबांच्या स्वप्नांना तिलांजली”, ‘त्या’ व्हायरल व्हिडीओवरून चित्रा वाघ आक्रमक
- “ही परिस्थिती १९९४ सारखीच, तेव्हा माझ्या वडिलांना…”; उत्पल पर्रीकरांची धक्कादायक माहिती
- “मी ज्ञानदान करतो, पैसा देण्याचं काम माझं नाही”, डिसले गुरुजींचे शिक्षणाधिकाऱ्यांना प्रत्युत्तर
- “शिवसैनिक कुठे आहेत त्यांनी पुढे यावं”, भोकरमध्ये अशोक चव्हाणांनी घडवले आघाडीच्या एकीचे दर्शन
- “विचार आणि उच्चारांत सत्यता, स्पष्टता, पारदर्शकता असलेले नेते बाळासाहेब ठाकरे”