मुंबई : निवडणूक आयोगाने (Election Commision) शिवसेना (Shivsena) नाव आणि पक्षाचं धनुष्यबाण गोठल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उद्धव ठाकरे यांनी नवीन नाव आणि चिन्ह जाहीर केली आहेत. बाळासाहेबांची शिवसेना असं नाव देत ढाल आणि तलवार चिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळालं असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं नाव आणि मशालचं चिन्ह उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मिळालं आहे. अशातच काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एकनाथ शिंदे यांना टोला लगावला होता. यालाच प्रत्युत्तर देत भाजप नेते केशव उपाध्ये यांनी ट्विट केलं आहे.
केशव उपाध्ये यांचं नाना पटोले यांना प्रत्युत्तर –
बाळासाहेबांची ढाल करणे आणि मागून भाजपची तलवार चालवणे हेच शिंदे गटाचे चिन्ह , अशी टीका नाना पटोंलेंनी (Nana Patole) केली होती. याला प्रत्युत्तर देत, नाना तुमच दुःख समजू शकत. महाविकास आघाडीत तिन्ही पक्ष एकमेकाना संपवू पहात होते म्हणून आघाडी कोसळली.. इथे बाळासाहेबांची शिवसेना व भाजपाच हिंदुत्वाच व महाराष्ट्राच विकासाच नात आहे. अर्थात कॅाग्रेसला समजणार नाही कारण विकास व हिंदुत्व याचा कॅाग्रेसशी संबधच नाही, असं केशव उपाध्ये (Keshav Upadhye) म्हणाले आहेत.
पाहा ट्विट –
नाना तुमच दुःख समजू शकत. महाविकास आघाडीत तिन्ही पक्ष एकमेकाना संपवू पहात होते म्हणून आघाडी कोसळली.. इथे बाळासाहेबांची शिवसेना व भाजपाच हिंदुत्वाच व महाराष्ट्राच विकासाच नात आहे. अर्थात कॅाग्रेसला समजणार नाही कारण विकास व हिंदुत्व याचा कॅाग्रेसशी संबधच नाही. https://t.co/WsBLsvSrTn
— Keshav Upadhye (@keshavupadhye) October 12, 2022
उद्धव ठाकरे यांच्या नवीन चिन्हावर आता आणखीन एका पक्षाचा दावा –
दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या नवीन चिन्हावर आता आणखीन एका पक्षाने दावा केला आहे. ECI ने शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला मशाल चिन्ह मंजूर केले आहे. परंतु मशाल हे चिन्ह 2004 मध्ये निवडणूक आयोगाकडे समता पक्षाचे नोंदणीकृत चिन्ह आहे. आमचा पक्ष 1994 पासून राष्ट्रीयीकृत पक्ष आहे आणि आमची जनमानसात चांगली प्रतिष्ठा आहे. तरी तुम्हाला विनंती आहे की शिवसेनेला मशाल व्यतिरिक्त कोणतेही चिन्ह द्यावे”, असे समता पक्षाने म्हटले आहे. अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीत देखील उमेदवारी देण्याचे संकेत देखील समता पक्षाने दिले आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Uddhav Thackeray | शिवसेना आघात करणाऱ्याला गाडून चार पटीने उभी राहते – उद्धव ठाकरे
- Uddhav Thackeray | “…त्यांना गाडून शिवसेना पुढे गेली”; उद्धव ठाकरेंचा विरोधकांवर हल्ला
- Sanjay Raut । कठीण काळात मी उद्धव ठाकरेंना सोडले तर उद्या बाळासाहेबांना काय तोंड दाखवू?; संजय राऊतांच भावनिक पत्र
- उद्धव ठाकरेंच्या अडचणीत वाढ? ऋतुजा लटके यांचा राजीनामा महापालिकेने फेटाळला
- Bhaskar Jadhav | प्रक्षोभक भाषणप्रकरणी गुन्हा दाखल होताच भास्कर जाधवांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…