पुरस्थितीची पाहणी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी केरळमध्ये दाखल

टीम महाराष्ट्र देशा – केरळमध्ये पुराच्या पाण्याने थैमान घातले आहे. पुरस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वच स्तरातून प्रयत्न सुरु आहेत. तर या महापुरात आजपर्यंत तीनशेच्या वर बळी गेले असून हजारो कोटींचे नुकसान झाले आहे. तसेच अडीच लाखांवर नागरिक बेघर झाले आहेत. पुरामुळे राज्यातील १४ जिल्ह्यांपैकी १३ जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे.  तेथील पुरस्थितीची पाहणी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी केरळमधील कोचीमध्ये दाखल झाले आहेत.

Loading...

प्रशासनाकडून राज्याचे ८ हजार कोटीचे नुकसान झाले असल्याचे जाहीर करण्यात आले आहे मुख्यमंत्री पिनराई विजयन हे देखील यावेळी त्यांच्या सोबत असतील. तिन्ही संरक्षण दले तसेच राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (एनडीआरएफ)चे जवान केरळमध्ये मदतकार्यात गुंतले आहेत. तिथे लष्कराच्या १२ तुकड्या तर नौदलाच्या ४२ तुकड्या मदत व पुनर्वसनाचे काम करीत आहेत. पुराच्या पाण्यामुळे घरांच्या गच्च्यांवर अडकून पडलेल्या असंख्य लोकांची सुटका करण्याचे काम या मदतपथकांनी हाती घेतले आहे. या लोकांना संरक्षण बोटीतून तसेच संरक्षण दलाच्या हेलिकॉप्टरमधून सुरक्षित स्थळी हलविले जात आहे.

पक्षाची रसद कापण्यासाठी युतीच्या ‘ह्या’ मंत्र्याला घेरण्याच्या तयारीत भाजप

चालता-बोलता विश्वकोष काळाच्या पडद्याआड गेला : सुप्रिया सुळेLoading…


Loading…

Loading...