केरळसाठी देऊ केलेली युएईची ७०० कोटींची मदत केंद्र सरकारने नाकारली

टीम महाराष्ट्र देशा : केरळमध्ये आलेल्या भीषण प्रलयाने लाखो लोकांना बेघर व्हावं लागल आहे, तर ४०० हून अधिक जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. दरम्यान, युनायटेड अरब अमिरातकडून केरळसाठी देऊ करण्यात आलेली ७०० कोटींची मदत केंद्र सरकारने नाकारली आहे.

देशात निर्माण झालेल्या संकटाला आपणच सक्षमपणे तोंड देवू, तसेच यातून बाहेर पडू, असे सरकारचे धोरण आहे, त्यामुळे युएईची मदत घेण्यास सरकारने नम्रपणे नकार दिला आहे. दोन दिवसांपूर्वी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी युएईकडून करण्यात येणाऱ्या मदतीची माहिती दिली होती.

जवळपास ३० लाखांच्यावर भारतीय युएईमध्ये राहतात, यातील ८० टक्यांच्यावर केरळातील नागरिक आहेत. त्यामुळे युएईच्या विकासामध्ये केरळचा मोठा वाटा असल्याने युएईकडून ही मदत जाहीर करण्यात आली होती.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष गुरुदास कामत, काळाच्या पडद्याआड