‘रस्त्यांची देखभाल येत नसेल तर इंजिनीयर्सनी राजीनामा द्यावा’, केरळ हायकोर्टाच्या अधिकाऱ्यांना कानपिचक्या

‘रस्त्यांची देखभाल येत नसेल तर इंजिनीयर्सनी राजीनामा द्यावा’, केरळ हायकोर्टाच्या अधिकाऱ्यांना कानपिचक्या

kerala high court

मुंबई: राज्यात झालेल्या पावसानंतर रस्त्यांची अवस्था प्रचंड खराब झाली आहे. खराब झालेल्या रस्त्यांबद्दल वारंवार येणाऱ्या तक्रारींवरुन केरळ उच्च न्यायालयाने (kerala high court)आता संबंधित अधिकाऱ्यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या आहेत.

रस्त्यांची देखभाल कशी करावी हे जर इंजिनीयर्सना(Engineers ) माहित नसेल तर त्यांनी राजीनामा द्या, विभागाकडे जर कौशल्यपूर्ण इंजिनियर्सची कमतरता असेल तर बाहेर अनेक उच्चशिक्षित लोक आहेत, त्यांना संधी द्या. अशा शब्दात न्यायालयाने संबंधित अधिकाऱ्यांना झापलं आहे. न्यायमूर्ती देवन रामचंद्रन(Justice Devan Ramachandran) यांच्या खंडपीठाने हे सुनावलं आहे. या अधिकाऱ्यांनी कोर्टाच्या सूचनांकडे साफ दुर्लक्ष केल्याने ही परिस्थिती ओढावल्याचंही केरळ हायकोर्टाने म्हटले आहे.

न्यायालयाने संबंधित अधिकाऱ्यांना विचारलं की दरवर्षी रस्ता थोडाथोडा खराब होत होता, त्याकडे अधिकाऱ्यांनी साफ दुर्लक्ष कसं काय केलं? जर तुम्ही रस्त्याकडे लक्ष ठेवून होता तर तुम्हाला कळलं नाही का की रस्ता कधी खराब झालाय? स्वतः त्या रस्त्यावरुन जाताना सुद्धा तुम्हाला लक्षात आलं नाही का? तुम्हाला हे पाहून ऐकून लाज वाटत नाही का? कारण मला हे सगळं सांगतानाच लाज वाटत आहे. अशा शब्दांत केरळ हायकोर्टाने अधिकाऱ्यांना सुनावले आहे.

महत्वाच्या बातम्या: