आता मद्यपींना टॅक्सी, रिक्षात नो एन्ट्री

Kerala government restricted drinking passengers

वेबटीम : मद्यपान केलेल्या व्यक्तीला रिक्षा, टॅक्सीत बसवल्यास चालकांवर कारवाई करण्यात येईल, असा अजब फतवा केरळ सरकारच्या परिवहन मंत्रालयाने काढला आहे. मात्र अशा प्रकारचा आदेश हा चालकांसाठी अन्यायकारक आणि डोकेदुखी चा विषय ठरणार असल्याचा सूर उमटत आहे.

रस्ते सुरक्षेच्या कारणास्तव हा आदेश केरळ सरकारनं काढला आहे. मद्यपान करून गाडी चालवणे हा गंभीर गुन्हा आहे. मात्र आता मद्यपान करून टॅक्सी, रिक्षा, ओला, उबेर यामध्येही बसणे मद्यपींना या आदेशामुळे कठीण होणार आहे. कारण दारू प्यायलेल्या प्रवाशांना गाडीत बसवू नका असा स्पष्ट आदेश देण्यात आला आहे. नियमाचं उल्लंघन करतांना कुणी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असंही परिवहन विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. मात्र दारू प्यायलेल्या व्यक्तीला गाडीत बसवणे हा गुन्हा कसा होऊ शकतो ?असा सवाल चालकांनी आणि स्थानिकांनी उपस्थित केला आहे.