केनिथ जस्टर होणार भारतातील अमेरिकेचे राजदूत ?

वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहारांसाठीचे उपसहाय्यक केनिथ जस्टर यांची भारतातील अमेरिकेचे राजदूत म्हणून नियुक्ती होण्याची शक्यता आहे. जस्टर हे भारतातील अमेरिकेचे नवे राजदूत असतील, असे व्हाइट हाऊसकडून काही दिवसांपूर्वी सांगण्यात आले होते.

केनिथ जस्टर यांच्या नियुक्तीस सिनेटची परवानगी मिळाल्यास रिचर्ड वर्मा यांच्या जागी जस्टर हे भारतातील अमेरिकेच्या राजदूत पदाचे काम पाहतील. २००१ ते २००५ दरम्यान जस्टर हे वाणिज्य उपमंत्री होते.