‘या’ कठीण प्रसंगी आम्ही तुमच्या पाठिशी,केजारीवालांचे उद्धव ठाकरेंसाठी ट्वीट

kejariwal- Thackeray

नवी दिल्ली : ‘निसर्ग’ चक्रिवादळ रायगड जिल्ह्यात धडकलं आहे. कोकण किनारपट्टीवर वाऱ्याचा वेगही वाढला आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टीला भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईसह श्रीवर्धन, अलिबाग तसंच सिंधुदुर्गात सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसाला सुरवात झाली आहे. अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या आहेत. तर काही ठिकाणी वीज पुरवठाही खंडीत झाला आहे.

कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अरबी समुद्रात निर्माण झालेले निसर्ग चक्रीवादळ महाराष्ट्राच्या दारावर आले असून चक्रीवादळानं बुधवारी दुपारी एक वाजता जमिनीला स्पर्श केला. वाऱ्याचा वेग वाढत आहे. किनारपट्टी परिसरात पाऊसही कोसळत आहे. या वादळाचा मुंबई, रायगड, रत्नागिरीसह अनेक भागाला तडाखा बसणार आहे.

‘वादळाच्या संकटकाळी प्रशासनासोबत राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उभं रहावं’

दरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करत उद्धव ठाकरे यांना या कठीण प्रसंगी आम्ही तुमच्या पाठिशी असल्याचं म्हटलं आहे. निसर्ग वादळाच्या पार्श्वभूीवर दिल्लीतील जनतेच्या वतीने महाराष्ट्रातील जनता आणि तुम्हाला पूर्ण पाठिंबा दर्शवत आहोत. महाराष्ट्रातील जनतेच्या सुरक्षेसाठी आम्ही प्रार्थना करत आहोत,” असं अरविंद केजरीवाल यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, या वादळाचा प्रकोप कोकणातील प्रदेशांसह नाशिक, पुणे या भागांना देखील जाणवणार आहे. सध्या किनारपट्टी भागात ताशी १०० हून अधिक वेगाने वारे वाहत आहेत. ज्यामुळे अनेक झाडं उन्मळून पडत आहेत.रत्नागिरीत तर काही घरांवरील पत्रेही उडून जात आहेत. सध्या या वादळाने रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, गुहागर इथून राज्यात एन्ट्री केली आहे.

फडणवीसांचा सेल्फगोल? पीएफआयने पत्रक प्रसिद्ध करून हवाच काढून टाकली