केजरीवाल पीडीतेच्या कुटुंबियांना भेटायला गेले अन् मंचावरून पडले

नवी दिल्ली: येथे एका ९ वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या करण्यात आली.एवढेच नाही तर सामूहिक बलात्कार आणि हत्येनंतर पीडितेवर आईवडिलांच्या संमतीशिवाय अंत्यसंस्कार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर सर्व स्तरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पीडित कुटुंबाला भेट दिली. यावेळी त्यांना विरोधाला सामोरे जावे लागले.

अरविंद केजरीवाल यांनी विरोधाचा सामना करत पीडित कुटुंबाची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री तेथील एका स्टेजवर पोहचले. मात्र, गर्दीमुळे ते स्टेजवरून खाली पडले. या सर्व गोंधळात ते खाली पडले. त्यांना सुरक्षा कर्मचाऱ्यांनी सांभाळले. त्यानंतर अरविंद केजरीवाल कारमध्ये बसून निघून गेले. त्यामुळे काहीकाळ या ठिकाणी गदारोळ झाला होता.

दरम्यान दिल्ली सरकारने पीडितेच्या कुटुंबाला दहा लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. यासह, आता या प्रकरणाची चौकशी केली जाईल. तसेच सरकारकडून मोठे वकील लावले जातील. जेणेकरून दोषींना कठोर शिक्षा मिळू शकेल. केंद्र सरकारने दिल्लीतील कायदा आणि सुव्यवस्था सुधारण्यासाठी कठोर पावले उचलावीत, आम्ही पूर्ण सहकार्य करू. असे मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले आहे.

महत्त्वाच्या बातम्या