fbpx

केजरीवालांना धक्का,कॉंग्रेसने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

टीम महाराष्ट्र देशा : असं म्हटलं जातं कि राजकारणात कोणीही कायमचं शत्रू नसतं त्यामुळेच एकमेकांवर सडकून टीका करणारे विरोधक कधी एक होतील याचा नेम नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींना पराभूत करण्यासाठी विरोधीपक्ष मोठी आघाडी निर्माण करण्याचा प्रयत्न करत असून एकेकाळचे कट्टर विरोधक राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल एकत्र येण्याचे संकेत आहेत.आघाडी करण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले केजरीवाल यांना दिल्ली काँग्रेसच्या अध्यक्षा शीला दीक्षित यांनी फटकारले आहे.

दरम्यान,आघाडी करण्यासाठी कॉंग्रेसनेत्यांच्या मागे केजरीवाल लागले होते. काँग्रेसच्या मागे लागून थकलो, पण आघाडीसाठी त्यांच्याकडून कोणताही संपर्क होत नसल्याचं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल काही दिवसांपूर्वी जाहीरपणे म्हणाले होते.

आपसोबत आघाडी करण्यास दीक्षित यांचा देखील विरोध असल्याचं बोललं जात आहे. राहुल गांधींसोबतच्या बैठकीनंतर दिल्लीत काँग्रेस-आपची युती होणार नाही दीक्षित यांनी स्पष्ट केलं आहे. दीक्षित यांनी दिलेल्या या माहितीमुळे केजरीवाल यांच्या स्वप्नांना मोठा धक्का बसला आहे.