केजरीवालांनी केले रोहित पवारांचे कौतुक;कारण जाणून घेण्यासाठी ही बातमी नक्की वाचा

blank

टीम महाराष्ट्र देशा:कर्जत जामखेडचे आमदार आणि शरद पवारांचे नातू रोहित पवार यांनी दिल्लीतील भेटीचा एका फोटो आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. त्यामध्ये, केजरीवाल सरकारने दिल्लीतील सरकारी शाळांचे बदलले मॉडेल रोहित पवारांना चांगलेच आवडले आहे. पवारांनी शिक्षणमंत्री मनिष सिसोदिया यांच्यासह शाळेतील मुलांसमवेत रोहित यांनी सेल्फी देखील काढला आहे.

रोहित यांनी नोव्हेंबर महिन्यात दिल्लीतील शाळांना भेट देऊन येथील स्कूल मॉडेलचा कौतुक केलं होतं. त्यानंतर, आज पुन्हा दिल्लीतील शाळा भेटीचे फोटो रोहित यांनी शेअर केले आहेत.

रोहित पवार यांना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. रोहित पवार यांचे ट्विट रिट्विट करत केजरीवाल यांनी केवळ शिक्षणातच आपल्या देशातील विकासाचे अन् बदलाचे सर्वात सामर्थ्य असल्याचे केजरीवाल यांनी म्हटले. रोहित पवार यांनी केजरीवाल यांच्या ट्विटला रिट्विट करत मी माझ्यापरीने प्रयत्न करेन, असेही पुढे म्हणाले आहे.

आमच्या विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचं शिक्षण देण्यासाठी आम्ही दिल्ली सरकारचं स्कुल मॉडेल आत्मसात करत आहोत. मी दिल्लीतील शाळा पाहून प्रभावित झालो होतो, आता महाविकास आघाडी सरकारने शिक्षण मॉडेल बदलाचा निर्णय घेतला आहे. त्याबद्दल, रोहित यांनी हेच महाराष्ट्राचं स्पीरिट असल्याचं म्हटलंय. तसेच माझ्या मतदारसंघातही मी लवकरच दिल्लीतील शाळांप्रमाणे स्कुल मॉडेल राबविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे म्हटले आहे.