विकासावर राजकारण करुन एकजुटीने रहावे – गुलाबराव पाटील

जळगाव : कर्जमाफीत गोंधळ निश्‍चित असल्याचा पुन:उच्चार करीत सहकार राज्यमंत्री तथा शिवसेना उपनेते गुलाबराव पाटील यांनी विकासावर राजकारण करुन एकजुटीने रहावे, असा सल्ला दिला. नोटबंदी घाईत केली, शेतक-याला सुद्धा जीएसटीमधून सोडले नसल्याचे सांगत त्यांनी केंद्र शासनावर टीका केली. पाथरी येथे सभामंडपाचे भुमिपूजन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

गुलाबराव पाटील म्हणाले की, सभामंडपाच्या अडचणी दूर झाल्या असून आमदार निधीतून आठ लाख ८० हजार रुपये दिले आहेत. आता पाच दिवसात दोन हायमस्ट लॅम्प देणार आहोत. स्मशानभुमीत बांधण्यात येत असलेल्या व्यायामशाळेत व्यायामासाठी सर्व टेक्निकल साहित्य उपलब्ध करुन देऊ.

bagdure

येत्या आठ दिवसात जवखेडा-पाथरी रस्त्याचे भुमिपूजन करणार आहोत. राज्यमार्ग १८४ हा महामार्ग होत आहे. पाथरी येथे लाभ होणा-या भागपूर प्रकल्पासाठी ५० कोटी रुपये मंजूर झाले असून पुढील महिन्यात काम सुरु होणार आहे. वावडदा-एरंडोल रस्त्यासाठी ११२ कोटी, कुरकुर नाल्यावर २५ बंधारे उभारण्यात येणार असून त्यासाठी साडेआठ कोटी रुपये मंजूर आहेत.

म्हसावद-पाथरी रस्ता कामही करु असे नमूद करुन पाटील यांनी शेतीपंपाचे चालू एक बिल भरण्याचे आवाहन केले. आ. किशोर पाटील यांनी महावितरणने १५ नोव्हेंबरनंतर हिंमत केली तर शिवसेना शेतक-यांच्या पाठीशी राहील. कापसाला सात हजार रुपये भाव मिळावा, संपूर्ण जिल्हा दुष्काळी जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली.

You might also like
Comments
Loading...