ईदसाठी आठ दिवस दुकाने उघडी ठेवा – खा. जलील यांची मागणी

खा. जलील

औरंगाबाद : छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांना रमजान ईद निमित्त दुकाने उघडू देण्यात यावी यासाठी मंगळवारी खा. इम्तियाज जलील यांनी पोलीस आयुक्यांची भेट घेतली. यावेळी व्यापारी वर्गाचे नुकसान आणि ओसरता कोरोना संसर्ग यावर देखील खा. इम्तियाज जलील आणि पोलीस आयुक्त यांच्यात चर्चा झाली. यावर लवकर तोडगा काढणार असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले.

रमजानचा महिना सुरु होऊन तब्बल २० दिवस उलटून गेले आहे. या महिन्यात बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात उलाढाल होत असते. अनेक छोटे व्यापारी याच महिन्यात वर्षभराची कमाई देखील करत असतात. मात्र, कोरोनाच्या वाढत्या संसर्गाने शहरात कडक निर्बंध लागले, त्यात अनेक व्यापाऱ्यांना दुकाने बंद करावी लागली. त्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यासाठी त्यांना आठ दिवस दुकाने उघडू देण्याची मागणी खा. इम्तियाज जलील यांनी केली.

सध्या जसे निर्बंध लावण्यात आले आहे. तसेच काही निर्बंध छोट्या मोठ्या दुकानदारांना लावण्यात येऊन त्यांना दुकाने उघडू द्यावी. तसेच सुरुवातीला शहरात बाराशेच्या वर रुग्णसंख्या होती. ती आता कमी होऊन तीनशे पर्यंत आली आहे. रुग्णसंख्या वाढणार नाही परंतु व्यापाऱ्यांना व्यापार करता येईल असे निर्बंध लावावे अशी चर्चा देखील खा. जलील यांनी पोलीस आयुक्तांसोबत केली. यावर पोलीस आयुक्तांनी लवकरच तोडगा काढणार असल्याचे खा. जलील यांना सांगितले.

महत्वाच्या बातम्या