केडगाव दुहेरी हत्याकांड प्रकरण; भानुदास कोतकरला अटक

अहमदनगर – केडगाव दुहेरी हत्याकांडप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या भानुदास कोतकरला सोमवारी पुणे येथून विशेष पथकाने अटक केली. केडगाव हत्याकांड प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार होता. कोतकरसह आमदार शिवाजी कर्डिले आमदार अरुण जगताप यांना अटक करावी या मागणीसाठी हत्याकांडात मृत पावलेल्या कोतकर-ठुबे कुटुंबीयांनी केडगाव येथे गेल्या दोन दिवसापासून उपोषण सुरू केले आहे. यानंतर सोमवारी अखेर कोतकरला अटक झाली.

कोतकर येरवडा पोलीस ठाण्यात हजेरी देण्यासाठी आला होता. यावेळी सापळा रचून बसलेल्या नगर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. लॉटरी विक्रेता अशोक लांडे हत्या प्रकरणात कोतकर याला जन्मठेपची शिक्षा झालेली आहे.

You might also like
Comments
Loading...