अहमदनगर : केडगाव शिवसैनिक हत्याकांड तपास सीआयडीकडे

अहमदनगर/प्रशांत झावरे :- महाराष्ट्रात खळबळ उडवून देणाऱ्या व पोलिसांच्या कार्यक्षमतेवर संशय उपस्थित करणाऱ्या अहमदनगर येथील केडगाव मधील शिवसैनिक दुहेरी हत्याकांड प्रकरणाचा तपास अखेर सीआयडीकडे वर्ग करण्याचा निर्णय घेतला असून गुन्ह्यासंदर्भात सर्व कागदपत्रे सीआयडीच्या पुणे अप्पर पोलीस महासंचालकांकडे देण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षकांना विशेष पोलीस महानिरीक्षक प्रभात कुमार यांनी दिले आहेत. या हत्याकांडानंतर महिनाभर चाललेल्या आरोप प्रत्यारोपामुळे अखेर अहमदनगर पोलिसांनी आता सुटकेचा निःश्वास टाकला आहे.

महापालिका पोटनिवडणुक निकालानंतर झालेल्या या दुहेरी हत्याकांडाच्या तपासावर आक्षेप घेत मयत शिवसेना उपशहरप्रमुख संजय कोतकर व वसंत ठुबे यांच्या कुटुंबीयांनी चार दिवस उपोषण केले होते. हत्याकांडातील आरोपी उजळ माथ्याने फिरत असून सर्वाना अटक करावी, तपास अधिकाऱ्यांवर तपासात हलगर्जीपणा केल्याने कारवाई करावी यांसह काही मागण्यासाठी हे उपोषण चालले होते. त्यादरम्यान पोलिसांनी आरोपी भानुदास कोतकरला अटक पण केली होती. त्यानंतर गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या मध्यस्तीने उपोषण आश्वासन घेऊन सोडण्यात आले. त्यानुसार पहिल्यांदा नवीन विशेष पथक स्थापन करून मालेगाव पोलीस उपअधीक्षक पोतदार यांच्या नेतृत्वाखाली तपास होणार होता. परंतु परत आदेश काढून हा तपास सीआयडीकडे वर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी

आरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी

सदर हत्याकांडाला सुमारे १ महिन्याच्यावर कालावधी उलटला असून गुन्हयाच्या तपसाबाबत राजकीय पक्षांकडून अनेक आरोप प्रत्यारोप करण्यात झाले आहेत. आता परत कोणत्याही प्रकारचे आरोप होऊ नये व त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रशचिन्ह निर्माण होऊ नये यासाठी हा गुन्हा सीआयडीकडे सुपूर्द करणे गरजेचे असल्याचे अहवाल पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी गृहविभागाला पाठविला होता, त्यानुसार गृहाविभागाने आदेश काढून गुन्हाच तपास अखेर सीआयडीकडे वर्ग केला आहे.

Shivjal